मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकरचं नाव कायमच घेतलं जातं. फक्त मराठी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही सईने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सई ताम्हणकरने नुकतंच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात जोडीदाराबद्दल भाष्य केले.

सई ताम्हणकर ही तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. तिने तिचं रिलेशनशिप, अफेअर, लग्न याबाबत अनेकदा भाष्य केले आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सई ताम्हणकरला जोडीदारबद्दलचा एक प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : Video : “तू रुसलास, पण कारण काय?” मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची सई ताम्हणकरकडून विचारपूस, म्हणाली “तू पुन्हा…”

“अनुरुप जोडी असण्यासाठी काही गुण जुळवावे लागतात. तुझ्यामते असा कोणता गुण आहे, जो तडजोड करणं अजिबात शक्य नाही”, असा प्रश्न अवधूत गुप्तेने सई ताम्हणकरला विचारला.

त्यावर सई ताम्हणकर म्हणाली, “स्वत: मध्ये स्व: ठेवून रिलेशनशिपमध्ये जगणं हे खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपून रिलेशनशिप करायला हवं. जो व्यक्ती स्वतःसोबत आपल्या जोडीदाराचेही स्वत्व ही जपतो, असा जोडीदार असणं गरजेचे आहे.”

आणखी वाचा : “…तरीही सहन करा”, चाहत्यांनी पाठवलेली पत्र पाहून संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, म्हणाला “या सगळ्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सई ताम्हणकरने अमेय गोसावी या व्यक्तीशी लग्न केलं होतं. मात्र तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. सध्या सई ताम्हणकर ही निर्माता अनिश जोगला डेट करत असल्याची चर्चा आहे. ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात. पण त्यांनी जाहिरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही.