अभिनेत्री शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ‘बन मस्का’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. सध्या ती ‘तुला शिकवीन चांगला धडा’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र नुकतंच शिवानीचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे.
शिवानीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘ उपनिषद गंगा’ मालिकेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या वडिलांबरोबर गणित शिकताना दिसत आहेत. यावेळी तिने परकर पोलकं परिधान केले आहे. यात ती प्रमुख भूमिकेत असल्याचे बोललं जात आहे. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “सगळे स्किनकेअर आणि मेकअप…”, संतुर साबणाबद्दल विचारलेल्या ‘त्या’ कमेंटवर उर्मिला निंबाळकरने दिले उत्तर, म्हणाली…
“माझं लहानपणीचं काम अचानक insta ला दिसू लागलं आणि मला खूप लोकांनी विचारलं की ‘ही तूच आहेस का?’!! गंमत वाटली की इतक्या वर्षांनी ही मी बहुतेक तशीच दिसत असेन म्हणून लोकांनी लगेच ओळखलं! इयत्ता पाचवीत असताना डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी ह्यांच्या ‘ उपनिषद गंगा’ नावाच्या मालिकेतली ही छोटीशी क्लिप!”, असे कॅप्शन शिवानी रांगोळेने दिले आहे.
दरम्यान शिवानीने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली. बन मस्का, शेजारी शेजारी पक्के शेजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा आणि सांग तू आहेस का या मालिकेत तिने काम केले आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.