‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार ( Shivani Sonar ) सध्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील मालिकेत पाहायला मिळत आहे. ‘सोनी मराठी’वरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत शिवानी अभिनेता सुबोध भावेसह प्रमुख भूमिकेत दिसत आहे. शिवानीच्या इतर भूमिकांप्रमाणे तिची या मालिकेतील तन्वी आणि गौरीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अशातच शिवानीने आपल्या आईला ५०व्या वाढदिवसानिमित्ताने हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री शिवानी सोनारने ( Shivani Sonar ) आईबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत तिने शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं असून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शिवानीच्या आईच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच शिवानीचा होणारा नवरा अंबर गणपुळेने देखील सासूबाईंना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य

शिवानी सोनारने ( Shivani Sonar ) शुभेच्छा देत लिहिलं आहे, “आमचा लाडोबा आज ५० वर्षांचा झाला. (वाटत नसेल तरी) वाढदिवसाच्या शुभेच्छा आई…मी कितीही चिडचिड करत असले तरी माझं तुझ्यावर आणि तुझ्यातल्या वेडेपणावर खूप प्रेम आहे. अशीच वेडी राहा…प्रत्येक जन्मात हिच आई मिळावी ह्यासाठी पूजा केली पाहिजे. नाही का?

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने स्वतःसाठी नाही तर ‘या’ व्यक्तीसाठी खरेदी केली आलिशान गाडी, म्हणाली, “ती गाडी माझी नसून…”

शिवानी सोनारच्या ( Shivani Sonar ) पोस्टवर सुकन्या मोने, विद्या सावळे, अर्थव चव्हाण अशा अनेकांची कमेंट केल्या आहेत. तसंच शिवानीचा होणारा नवरा गणेश गणपुळे कमेंट करत म्हणाला की, काकू वाढदिवसाच्या शुभेच्छा.

प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरसाठी ‘हे’ सीन होते आव्हानात्मक, म्हणाली, “अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवानी सोनारच्या ( Shivani Sonar ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘राजा राणीची गं जोडी’नंतर ती ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत झळकली. या मालिकेत तिने मोठ्या सिंधुताई सपकाळांची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिची ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. शिवानीचा होणारा नवरा गणेश गणपुळे देखील अभिनेता आहे. ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ या मालिकेत त्याने काम केलं आहे. सध्या तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळत आहे.