Vallari Viraj and Aalapini Nisal’s Dance Video: अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ दोघी कायमच त्यांच्या डान्स व्हिडीओंमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आगळ्यावेगळ्या संकल्पना आणि अफलातून डान्स स्टेप्स यांमुळे त्यांच्या अशा डान्स व्हिडीओची मोठी चर्चा होताना दिसते.

आता अभिनेत्री वल्लरी विराजने शेअर केलेल्या एका व्हिडीओची चर्चा होताना दिसते. या व्हिडीओमध्ये दोघींनी एका वेगळ्या संकल्पनेला धरून सुंदर सादरीकरण केले आहे. एक लवकर उठणारी आणि एक आळशी असणारी अशा दोघींची गोष्ट या सादरीकरणात पाहायला मिळते.

वल्लरी विराज व आलापिनी निसळ यांचे ‘दिल क्या करे…’, गाण्यावर सुंदर सादरीकरण

हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरीने ‘सत्य घटनांवर आधारित’ अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, वल्लरी लवकर उठून वेळेत आणि पटापट गोष्टी करते; तर आलापिनी हळूहळू कामे करताना दिसते. ते पाहून वल्लरी तिला घाईघाईत आवरायला भाग पाडते. ‘दिल क्या करे’, या गाण्यावरील हे सुंदर सादरीकरण लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. अनेकांनी या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. कमळीच्या भूमिकेत दिसणाऱ्या विजया बाबरने लिहिले, “अगं किती गोड”, अभिनेत्री सानिका काशीकरने लिहिले, “अगं किती गोड”, ऋतुजा बागवेने इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले; तर अनेक चाहत्यांनी, “वाह! बेस्ट”, “गोड”, “सुंदर”, “भारी आहेत या दोघी”, “खूप सुंदर”, अशा अनेक कमेंट केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी वल्लरी व आलापिनी यांनी मैत्रीदिनानिमित्त विविध चॅनेल्सना मुलाखती दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी याबद्दल वक्तव्य केले होते. वल्लरी लवकर आणि वेळेत आवरते आणि आलापिनीला थोडा वेळ लागतो असे त्या म्हणाल्या होत्या.

वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ या दोघी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एकत्र काम करत होत्या. या मालिकेत त्यांनी बहि‍णींची भूमिका साकारली होती. वल्लरी लीला या भूमिकेत दिसली होती, तर रेवती या भूमिकेतून आलापिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

मालिकेत या लीला आणि रेवती एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या, एकमेकींसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या आणि एकमेकींची काळजी घेणाऱ्या अशा दिसल्या होत्या. खऱ्या आयुष्यातही वल्लरी व आलापिनी यांच्यातही असेच नाते असल्याचे दिसते. मालिका संपल्यानंतर त्या डान्स व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.