Vandana Gupte Share Video Of Foot Injury : मराठी नाटक, मालिका व चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या वंदना गुप्ते सोशल मीडियावरही तितक्याच सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

वंदना गुप्तेंचा पावसामुळे एक छोटासा अपघात झाला आहे, ज्यामुळे त्यांचे नाटकाचे प्रयोगही रद्द झाले आहेत. या अपघाताबद्दल त्यांनी स्वत:च सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. वंदना गुप्तेंनी इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा नातूही पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये वंदना गुप्ते असं म्हणतात, “मला तुम्हाला सांगायचं आहे की, मी परवा पावसाच्या पाण्यात पाय घसरून पडले. त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आहे. मला चालायलाही भयंकर त्रास होत आहे. दुखापतीमुळेच ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचा १८ सप्टेंबरचा पुण्यातला आणि १९ सप्टेंबरचा बोरिवलीचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे. मी माझ्या सर्व प्रेक्षकांना सॉरी म्हणते.”

त्यानंतर व्हिडीओमध्ये पुढे वंदना गुप्तेंचा नातू रियान त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देतो. दरम्यान, या अपघातात वंदना गुप्तेंच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्यांना चालतानाही त्रास होत असल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे.

‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाबद्दल सांगायचं झाल्यास, या नाटकात वंदना गुप्ते यांच्यासह अभिनेत्री तन्वी मुंडले व संकर्षण कऱ्हाडे हे मुख्य भूमिकांत आहेत. रंगभूमीवर हे नाटक जोरात चाललं असून, त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.आहे.

वंदना गुप्ते यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ‘गगनभेदी’, ‘रमले मी’, ‘रंग उमलत्या मनाचे’, ‘अखेरचा सवाल’, ‘वाडा चिरेबंदी’ यांसारख्या अनेक नाटकांमधून काम केलं आहे. तसेच ‘लपंडाव’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘बे दुणे साडेचार’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘पछाडलेला’ व ‘बाईपण भारी देवा’सारखे अनेक सिनेमेही त्यांनी केले आहेत.

याशिवाय ‘आंबट गोड’ आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. काही दिसांपूर्वी त्या झी मराठीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. सध्या त्या ‘कुटुंब किर्रतन’ नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.