scorecardresearch

वनिता खरात २५ वर्षांपूर्वी कशी दिसायची? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

वनिताने नुकतंच तिचा २५ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे.

vanita kharat
वनिता खरात

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून वनिता खरातला ओळखले जाते. या कार्यक्रमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. वनिताने नुकतंच तिचा २५ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे.

वनिता खरात ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच वनिताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : Photos : काळे मणी, दोन वाट्या आणि दोन सरी; वनिता खरातच्या तीन मंगळसूत्रांच्या हटके डिझाईन

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वाहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा.
२ एप्रिल, रविवार रात्री ९ वा. चुकवू नका ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’चा शेवटचा भाग, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : एकेकाळी मुंबईच्या रेल्वे स्थानकावर झोपलेला ‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता, कारण…

दरम्यान ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यानिमित्ताने अनेक कलाकार २५ वर्षांपूर्वीचे फोटो शेअर करताना दिसत आहे. तसेच काही कलाकार हे फोटो शेअर करत अनेकांना नॉमिनेट करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 16:46 IST

संबंधित बातम्या