scorecardresearch

“शिवबरोबर एकदा तरी बोल…” वीणाचा ‘कार’नामा पाहिल्यानंतर चाहत्यांच्या कमेंट, अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली…

शिव ठाकरेबद्दलच्या कमेंट वाचून वीणा जगतापची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

veena jagtap shiv thakare
वीणा जगताप शिव ठाकरे

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वीणा जगतापला ओळखले जाते. वीणाने नुकतंच एक नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. तिने स्वत: पोस्ट करत याची माहिती दिली होती. पण आता वीणाने दिलेल्या या गुडन्यूजवर अनेक चाहते कमेंट करत तिला शिव ठाकरेची आठवण करुन देताना दिसत आहेत.

वीणाने बुधवारी (१ मार्च) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टद्वारे तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. वीणाने नुकतंच एक नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. तिने तिच्या गाडीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. वीणाने टाटा मोटर्सची टाटा पंच ही गाडी खरेदी केली आहे. तिने स्वत: हॅशटॅग देत याबद्दल सांगितले होते.
आणखी वाचा : वीणा जगतापचा ‘कार’नामा, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

“आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचे स्वागत. माझी पहिली गाडी… मेड इन इंडिया. व्होकल फॉर लोकल, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. वीणाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी तिला तिचा एक्स बॉयफ्रेंड शिव ठाकरेची आठवण करुन दिली आहे.

वीणाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. “अभिनंदन वीणा. काही दिवसांपूर्वी शिव ही बोलला होता की त्याला गाडी घ्यायची आहे? आणि इथे तू तुझी स्वप्न पूर्ण करत आहेस. खूपच छान”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर काहींनी “प्लीझ शिवबरोबर बोल ना”, “शिवला एकदा तरी भेट ना”, अशा कमेंट केल्या आहेत. त्याबरोबर काहींनी “शिव पण गाडी घेणार आहे”, असे तिला कमेंट करत सांगितले आहे.

आणखी वाचा : “शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत…” मिलिंद गवळींची भावूक पोस्ट

दरम्यान वीणाने या सर्व कमेंट वाचून प्रतिक्रियाही दिली आहे. “मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद”, असे वीणाने कमेंट करत म्हटले आहे. पण तिने शिवबद्दलच्या एकाही कमेंटवर उत्तर दिलेले नाही. काही दिवसांपूर्वीच वीणाने एक व्हिडीओ शेअर करत गाडीचे प्रशिक्षण घेतल्याचा अनुभव शेअर केला होता. त्यावेळी तिने तिला उत्तम गाडी चालवता येते हे देखील सांगितले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 12:21 IST
ताज्या बातम्या