विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशाखा सुभेदारचा आज वाढदिवस आहे. काही महिन्यांपूर्वी तिने जाड असण्यावरुन ट्रोल होण्यावर भाष्य केले होते.

विशाखा सुभेदारला कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी विशाखा सुभेदार झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने वजन आणि जाड असण्यावरुन होणाऱ्या ट्रोलिंगचा एक किस्सा सांगितला होता. एका कार्यक्रमादरम्यान माझ्या वजनावरुन माझी खिल्ली उडवण्यात आली होती, असे त्या यावेळी म्हणाल्या.
आणखी वाचा : “आम्ही सगळेच तिला हास्यजत्रेत…” समीर चौगुलेंची विशाखा सुभेदारसाठी खास पोस्ट

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

“मी एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी तिथे सूत्रसंचालन करणाऱ्यांनी माझी ओळख करुन देताना आता आपल्यासमोर येत आहे वजनदार व्यक्तीमत्त्व विशाखा सुभेदार आणि त्यांचं वजन जितकं अभिनयात महत्त्वाचे आहे, तितकंच त्यांचं वजन… असे तो सतत वजन वजन हा शब्द बोलत होता. त्यानंतर मी जेव्हा बोलायला गेले, तेव्हा एका वजनदार व्यक्तीमत्त्वाची एका किरकोळ माणसाने अत्यंत वजनदार पद्धतीने ओळख करुन दिली आहे. तर या वजनदार माणसाकडून त्या किरकोळ आणि सामान्य माणसाला अतिशय मानाचा मुजरा. त्यावेळी त्याला अतिशय खजील झाल्यासारखे वाटले.

त्यानंतर त्या व्यक्तीने माझी माफी मागितली. त्यावेळी तो म्हणाला, ‘मी सहज विनोद करायला गेलो.’ तेव्हा विशाखाने त्याला म्हटले “त्या वजनाचे किंवा विनोदाचे आम्हाला पैसे मिळतात.” तुम्ही आता माझे जे जाडेपण लोकांच्या डोळ्यासमोर उघडं पाडलात त्याचे मला पैसे मिळत नाही. मग मी का ऐकून घेऊ. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, मला वाटलं तुम्हाला मज्जा येईल. जस इतर स्किट्समध्ये तुमच्या वजनावर बोललो की तुम्ही हसण्यावारी नेता. त्यावर मी “त्याचे पैसे द्या, मला चालेल”, असे मी म्हटले होते.

आणखी वाचा : “बुलेट ट्रेननंतर हास्यजत्रा…” मालिकेत कमबॅक करणाऱ्या विशाखा सुभेदारने ट्रोल करणाऱ्याला खडसावले

“जाडेपणा आणि बारीक यात एखाद्या बाईमध्ये जो भेद केला जातो, त्याचा त्रास होतो. एखादी आई ही कायम बिचारी बारीक, सोशिक आणि आंबाडा बांधलेली असते. मग एखादी जाडी बाई बिचारी सोशिक असू शकत नाही का?? त्यामुळे त्या भूमिका साकारता येत नाही. कारण मी कोणत्याच अँगलने गरीब बिचारी वाटत नाही”, अशी खंतही विशाखा सुभेदारने व्यक्त केली होती.

दरम्यान विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडच्या काळात, विशाखा ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ६६ सदाशिव (२०१९) या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या.