सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लग्नघाई सुरू आहे. अनेक लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्री विवाह बंधनात अडकणार आहेत, तर तर काहीजण त्यांचं लग्न ठरल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आता या यादीत कलर्स मराठी वरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे याचं नाव सामील झालं आहे.

संत बाळूमामा यांची भूमिका सकारत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवणारा अभिनेता सुमीत पुसावळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच सुमीतचा साखरपुडा पार पडला. त्याने त्याच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत त्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव

१६ नोव्हेंबर रोजी त्याने एक पोस्ट शेअर करत त्याच्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हा होणाऱ्या बायकोचा हात हातात घेतलेला एक फोटो शेअर करत त्याने म्हटलं होतं, “जेव्हा तुम्ही पळून जायला खूप उशीर करता…” त्यानंतर काल त्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात ते दोघेही दाक्षिणात्य वेषभूषेमध्ये दिसत आहेत. सुमीतच्या होणाऱ्या बायकोचं नाव मोनिका आहे.

हेही वाचा : मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणाऱ्या सुमीत पुसावळेबद्दल काही खास गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासोबतच त्याने मोनिकाबरोबरचा आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तळ्यात एक मचाण बांधलेली दिसत आहे आणि त्या मचाणीवर ही दोघं आहेत. यावेळी सुमीत गुडघ्यावर बसून मोनिकाला प्रपोज करताना दिसत आहे. सुमितचे हे दोन्ही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंवर कमेंट करत त्याचे चाहते त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.