झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका या सातत्याने चर्चेत असतात. याच वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. याच मालिकेत मिनाक्षी वहिनी हे पात्र अभिनेत्री स्वाती देवलने साकारले होते. नुकतंच स्वातीच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

स्वाती देवल ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध गोष्टींवर भाष्य करत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने कधीच खंत करु नये, असे म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : “मला वेड लागले प्रेमाचे…” मानसी नाईकचा प्रसिद्ध रिल स्टारबरोबरचा व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले “ही जोडी…”

स्वाती देवलची पोस्ट

“पूर्वीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही. त्यामुळे गतजन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मी भाऊ, बहिण, नातेवाईक, शेजारी स्वरुपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या न कोणत्या रुपात येऊन परतफेड करतात.

त्यामुळे मी सरळमार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्याच बाबतीत असे का घडावे, याची कधीच खंत करु नये”, अशा आशयाची पोस्ट स्वातीने शेअर केली आहे.

swati deval
स्वाती देवलची पोस्ट

आणखी वाचा : MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार नेमकी कोण? जाणून घ्या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या स्वाती देवलची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. तिने ही पोस्ट का आणि कशासंदर्भात केली, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान स्वाती देवल ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत मिनाक्षी वहिनी हे पात्र साकारलं होतं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल हा तिचा पती आहे.