Megha Dhade’s Daughter Sakshi Pawaskar Want’s To Pursue Career In Acting : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. यामध्ये ती खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मेघा धाडे गेली अनेक वर्षे अभिनयक्षेत्रात सक्रिय असून आता तिच्या पाठोपाठ तिची लेकसुद्धा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे.

मेघा धाडे व तिची मुलगी साक्षी पावसकरने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिची लेक काय करते, तिने कशामध्ये शिक्षण घेतलं आहे याबद्दल सांगितलं आहे. मेघा व साक्षी यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यामध्ये साक्षीला ती काय करते याबद्दल विचारण्यात आलेल.

साक्षी याबाबत म्हणाली, “मी फिल्म प्रॉडक्शनचा कोर्स केला आहे. त्यामध्ये मला पडद्यामागे कसं काम केलं जातं या सर्व गोष्टी कळल्या. यानंतर मी ‘अनुपम खेर अॅक्टर्स प्रीपेअर्स’ मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर माझे ऑडिशन सुरू झालं. मला पेंटिंगचीसुद्धा आवड आहे. मी शाळेत असल्यापासून मला याची आवड आहे.”

साक्षी पुढे म्हणाली, “शाळेत असताना मी इंग्रजी विषयात चांगली होते. शालेय शिक्षण झाल्यानंतर मी फाइन आर्ट्सचं शिक्षण घेतलं, कारण लहानपणापासूनच पेंटिंगची आवड आहे. यासह मला अभिनयक्षेत्राची लहानपणापासूनच आवड होती. आईमुळे सतत या गोष्टींच्या अवती भोवती असल्याने सिनेमाची आवड होतीच. पण, माझा स्वत:वर विश्वास नव्हता की, मी हे करू शकेन की नाही याबाबत. नंतर मी फॅशन डिझाइनचा कोर्स करत होते, पण मला तेव्हा जाणवलं की, माझ्याकडून हे काही होणार नाही. मला फक्त चांगले कपडे घालायला आवडतात.”

मेघा धाडेची लेक साक्षी करणार अभिनयक्षेत्रात पदार्पण

“अभिनयाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मी काही काळ एके ठिकाणी नोकरी केली. आर्टशी संबंधित होती ती”. पुढे मेघा लेकीबद्दल म्हणाली, “गेली एक वर्ष ती आमच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे तो बघत होती, जो तिने खूप छान प्रकारे सांभाळला. आमच्यापेक्षा चांगलं काम तिने केलं. पण, यामुळे तिचं अभिनयावरचं लक्ष हटलं, त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण, आता ती पुन्हा याकडे वळली आहे. यासह तिला बेकिंगचीसुद्धा खूप आवड आहे. तिला पुढे जाऊन त्यातही व्यवसाय करायचा होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मेघाच्या पाठोपाठ तिची लेकसुद्धा लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं दिसतं. मेघाने आजवर चित्रपट, मालिका यांमध्ये काम केलं आहे, त्यामुळे आता तिची मुलगी कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणं रंजक ठरेल.