अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. गेल्या वर्षी ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. मृणाल कुलकर्णी यांची शिवानी अत्यंत लाडकी आहे. अनेकदा त्या समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. तर आता शिवानी मोठ्या कालावधीनंतर मालिकेत दिसत आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही तिची मालिका कालपसून सुरु झाली. यानिमित्त तिच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अक्षरा असं तिच्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. कालच या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. शिवानी या मालिकेसाठी जितकी आनंदी आणि उत्सुक आहेत, तितकेच तिच्या घरचेही तिच्यासाठी खुश आहेत. आता मृणाल कुलकर्णी यांनी त्यांचा हा आनंद एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला. त्याचबरोबर या टीमला शुभेच्छा देत त्यांनी शिवानीला एक गमतीशीर सल्लाही दिला.

आणखी वाचा : Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

मृणाल कुलकर्णी यांनी शिवानीची एक पोस्ट शेअर करत लिहिलं, “प्रिय शिवानी, तुझ्या नवीन मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ! तुला ‘अक्षरा’च्या भूमिकेत बघायला उत्सुक आहोत ! मला खात्री आहे तू धमाल उडवून देशील पण धडे मालिकेतल्या सासूला आणि नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं !!!! या मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा !” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यांचं आणि शिवानीमध्ये असलेलं हे बॉण्डिंग आणि त्यांचा हा गमतीशीर अंदाज नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

हेही वाचा : “विराजस, आता तरी…” लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी त्याला दिला ‘हा’ खास सल्ला, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी जवळपास 8 वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.