Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding Photos : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी २१ डिसेंबरला चिपळूण येथे थाटामाटात लग्न केलं. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नसोहळ्यातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, आता या नवीन जोडप्याने इन्स्टाग्रामवर लग्नसोहळ्यातील काही खास क्षण शेअर केले आहेत.

मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा चिपळूणमध्ये मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनुसार पार पडला. यावेळी गायिकने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर प्रथमेशने लाल रंगाच्या कुर्त्यावर पुणेरी पगडी असा लूक केला होता. पैठणी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने या लूकमध्ये मुग्धा फारच सुंदर दिसत होती. तिचं स्टायलिंग तिची मोठी बहीण मृदुल वैशंपायनने केलं होतं. यापूर्वी दोघांच्या हळद आणि ग्रहमख सोहळ्यातील फोटोंनी देखील लक्ष वेधलं होतं.

हेही वाचा : “माझा मुलगा शाळेतून अस्वस्थ होऊन आला अन्…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला अनुभव; म्हणाले, “हिंसक कथा…”

मुग्धा-प्रथमेशने सोशल मीडियावर नुकतेच त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना त्यांनी “आमचं झालंय!” असं कॅप्शन दिलं आहे. मुग्धा-प्रथमेशची ही लग्नानंतरची पहिलीच पोस्ट असल्याने या फोटोंवर सध्या त्यांचे चाहते आणि कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video: सलमान खान आला, अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतली अन् शेजारी असलेल्या अभिषेकला…, तिघांचाही व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्याला त्यांचे ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमातील लाडके मित्र रोहित राऊत, जुईली जोगळेकर, शमिका भिडे, अवंती पटेल, कार्तिकी गायकवाड यांनी देखील उपस्थिती लावली होती.