‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायन नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या सुमधूर आवाजामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. लग्न झाल्यापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील चर्चा रंगलेली असते. अशातच मुग्धा लवकरच श्रोत्यांसाठी एक खास गोष्ट घेऊन येत आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

मुग्धा वैशंपायनने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. स्वतःचा सेल्फी फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं, “कामासाठी वेड्यासारखी धावतेय. लवकरच माझ्या युट्यूब चॅनेलवर काहीतरी नवीन घेऊन येत आहे. असेच जोडलेले राहा.”

हेही वाचा – रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत

मुग्धाने या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर एक पोस्ट केली आणि श्रोत्यांसाठी ती काय नवीन घेऊन येतेय, याचा खुलासा केला. रामनवमीला मुग्धाचं नवं गाणं भेटीस येतं आहे. ‘राघवा रघुनंदना’, असं या गाण्याचं नाव आहे. याचा पोस्टर शेअर करत मुग्धाने लिहिलं, “सगळ्यांना हॅलो, रामनवमीला म्हणजे १७ एप्रिल २०२४ला ‘राघवा रघुनंदना’ हे मी स्वतः संगीतबद्ध केलेलं, गायलेलं गाणं तुमच्या भेटीला घेऊन येत आहे मुग्धा वैशंपायन ऑफिशिअल या माझ्या युट्यूब चॅनलवर.”

हेही वाचा – “एक्स खूप मोठी गटार गंगा…”, चिन्मय मांडलेकरचं स्पष्ट मत; सोशल मीडियावर सक्रिय नसण्याबाबत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी रामनवमीच्या निमित्ताने प्रथमेश लघाटेचं ‘अंतरी माझ्या श्रीराम’ हे गाणं श्रोत्यांच्या भेटीस आलं होतं. या गाण्यासाठी प्रथमेशनं फक्त आवाज दिला नव्हता, तर तबला, ताल वाद्य, तालवाद्य संयोजन, मिक्सिंग, मास्टरींग, सिनेमॅटोग्राफी, व्हिडीओ ए़डिटिंग या सर्व जबाबदारी उत्तमरित्या पेलल्या होत्या. त्यामुळेच या गाण्याला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. युट्यूबवर या गाण्याला १२ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. तर २२ हजारांहून अधिक लाइक्स आहेत.