‘बिग बॉस १७’ चा विजेता व लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मुनव्वरने सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवाला हिच्याशी लग्न दुसरं केलं आहे. दोघांनी अद्याप लग्नाबद्दल काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही, अशातच मुनव्वरने केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
मुनव्वर व मेहजबीन यांचं लग्न तीन आठवड्यांपूर्वी झालं असं म्हटलं जात आहे. या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते. मुनव्वर व मेहजबीन यांच्या कुटुंबियांशिवाय काही मोजकेच मित्र या लग्नाला गेले होते. मुनव्वरच्या कुटुंबातील एका सदस्यानेच या लग्नाबाबत माहिती दिली होती. तसेच मुनव्वर व मेहजबीनचे केक कापतानाचे फोटोही समोर आले होते. मात्र या दोघांनीही अद्याप लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही, अशातच मुनव्वरने मेहजबीनची एक स्टोरी रिशेअर केली आहे.
घटस्फोटित आहे मुनव्वर फारुकीची दुसरी पत्नी, दिसते खूपच ग्लॅमरस; काय काम करते? जाणून घ्या
मुनव्वर फारुकी सध्या स्टँडअप कॉमेडीचे शो करत आहे. भआरतात व विदेशात त्याचे शो होत आहेत आणि त्यानिमित्ताने तो सतत प्रवास करत आहे. त्याने त्याच्या काही शोबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली होती. मुनव्वरचा स्टेजवर परफॉर्म करतानाचा एक फोटो मेहजबीनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्या फोटोवर तिने “तुझा अभिमान वाटतो,” असं लिहून मुनव्वरला टॅग केलं आहे व रेड हार्ट इमोजी दिला आहे. या फोटोला तिने ‘देखा तेनू पेहली पेहली बार वे’ हे सध्या ट्रेंडिंग असलेलं गाणं लावलं आहे.

मेहजबीनची ही स्टोरी मुनव्वर फारुकीने रिशेअर केली आहे. त्याने स्टोरी रिशेअर करत त्यावर निळ्या रंगाचा हार्ट इमोजी वापरला आहे. मुनव्वर व मेहजबीनच्या या दोन्ही स्टोरीची खूप चर्चा होत आहे.

कोण आहे मेहजबीन कोटवाला?
मुनव्वरची दुसरी पत्नी मेहजबीन कोटवाला ही मेमन समुदायातील आहे. ती मुंबईतील आग्रीपाडा इथं राहते. मेहजबीनचं आधी लग्न झालं होतं आणि तिला पहिल्या लग्नापासून १० वर्षांची मुलगी देखील आहे.
मुनव्वरचं पहिलं लग्न अन् अफेअर
मुनव्वरचं पहिलं लग्न २०१७ मध्ये जॅस्मिनशी झालं होतं. पण त्यांचा घटस्फोट झाला. मुनव्वरला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे, जो त्याच्याजवळ राहतो. घटस्फोटानंतर मुनव्वरने ‘लॉकअप’ फेम अंजली अरोरा, नाझिला सिताशी व आयशा खान यांना डेट केलं होतं. आयशा खानने ‘बिग बॉस १७’ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती, त्यानंतर मुनव्वरवर फसवणुकीचे आरोप केले होते.