‘बिग बॉस १७’ व ‘लॉकअप’ विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने दुसरं लग्न केलं आहे. त्याने १०-१२ दिवसांपूर्वी गुपचूप लग्न उरकलं आहे. त्याच्या दुसऱ्या लग्नाचा काही मोजकेच लोक उपस्थित होते. त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने त्याच्या लग्नाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

मुनव्वरच्या कुटुंबातील एका सदस्याने ‘इंडियन एक्सप्रेस’ शी बोलताना त्याच्या लग्नाच्या बातमीची पुष्टी केली आहे. त्याने मेहजबीन कोटवाला हिच्याशी लग्न केलं आहे. मेहजबीन ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती मुंबईतील आग्रीपाडा इथं राहते. दरम्यान, मुनव्वर व मेहजबीन यांचे लव्ह मॅरेज आहे की ॲरेंज्ड मॅरेज आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. १० ते १२ दिवसांपूर्वी या जोडप्याने मुंबईत लग्न केलं आणि नंतर रविवारी आयटीसी मराठा याठिकाणी लग्नाचे रिसेप्शन होते. या दोघांच्या लग्नात फक्त १०० पाहुणे होते, अशी माहितीही सूत्राने दिली.

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने केलं दुसरं लग्न, हिना खानने लावली हजेरी, ‘तो’ फोटो व्हायरल

मुनव्वरच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा त्याच्या फॅन अकाऊंटने शेअर केलेल्या एका पोस्टनंतर सुरू झाल्या. त्याच्या लग्नाचा दावा करणारी पोस्ट या फॅनपेजवरून टाकण्यात आली होती. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर मुनव्वरचं दुसरं लग्न झालंय, अशा बातम्या समोर आल्या. त्यानंतर त्याच्या जवळच्या लोकांनी लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. मुनव्वर आणि मेहजबीन या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे किंवा एकमेकांबरोबरचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. मुनव्वरला लग्न गुपित ठेवायचं असल्याने त्याने फोटो शेअर केले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?

दरम्यान, ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर ठरला होता, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याची या शोमध्ये खूप चर्चा झाली होती. या शोमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान ही वाइल्ड कार्ड म्हणून आली होती आणि तिने शोमध्ये मुनव्वरवर गंभीर आरोप केले होते. फसवणूकीचे आरोपही तिने त्याच्यावर केले होते. याशिवाय त्याची आणखी एक गर्लफ्रेंड नाझिला सिताशी हिनेही मुनव्वरने फसवणूक केल्याचं म्हटलं होतं.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

मुनव्वरचे हे दुसरे लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न जॅस्मिनशी झालं होतं, त्यांनी पाच वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. मुनव्वर एकटाच मुलाचा सांभाळ करतो, त्याच्या पहिल्या पत्नीचं लग्न झालं आहे आणि तो तिच्या संपर्कात नाही, असा खुलासा त्याने बिग बॉसच्या घरात केला होता. दरम्यान, मुनव्वरची दुसरी पत्नी मेहजबीन हीदेखील घटस्फोटित आहे.