‘बिग बॉस ओटीटी’ विजेती अभिनेत्री दिव्या अगरवाल हिने तीन महिन्यांपूर्वी मराठमोळा बिझनेसमन अपूर्व पाडगांवकर याच्याशी लग्न केलं होतं. पण आता या दोघांनी त्यांच्या लग्नाचे सर्व फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून हटवले आहेत. दोघांच्या इन्स्टाग्रामवर त्यांचे एकमेकांबरोबरचे फोटो दिसत नसल्याने घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दिव्या अग्रवाल आणि तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकर २० फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेत्रीच्या चेंबूर येथील घरी लग्नबंधनात अडकले होते. त्यांनी २० फेब्रुवारीला संध्याकाळी घरीच लग्न केलं होतं. दिव्या व अपूर्व यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले होते. फक्त लग्नाचेच नाही तर जोडीने त्यांनी काही फोटोशूट केले होते, त्याचेही फोटो त्यांच्या अकाउंटवर होते, मात्र दोघांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ते फोटो दिसत नाहीयेत. अपूर्वच्या अकाउंटवर दिव्याबरोबरचे काही ब्रँडच्या शूटचे फोटो दिसत आहेत. लग्न व इतर फोटो त्यांनी हटवले आहेत.

दिव्या अग्रवाल झाली मराठी कुटुंबाची सून, तिचा पती आहे प्रसिद्ध उद्योजक, तर ती अभिनयाशिवाय करते ‘हा’ व्यवसाय

अपूर्व पाडगांवकर हा मराठी आहे. अपूर्वशी लग्न केल्यावर दिव्याने पहिल्या गुढी पाडव्याचे काही खास फोटोही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले होते. मात्र हे फोटोही तिने डिलीट केले आहेत. तिच्या अकाउंटवर अपूर्वबरोबरचा एकही फोटो नाही. दोघांच्या अकाउंवरील लग्न व इतर फोटो हटवल्याचं पाहून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यातच हे दोघेही घटस्फोट घेणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखरच्या आईला ‘या’ नावाने मारते हाक, जाणून घ्या मराठमोळ्या स्मृती शिंदेंबद्दल

दिव्याने तीन महिन्यांपूर्वी घरीच अत्यंत साधेपणाने लग्न केलं होतं. लग्नात तिच्या साधेपणाचं चाहते खूप कौतुक करत होते. खरं तर दिव्या नेहमीच लाइमलाइटमध्ये असते, पण तिचा पती अपूर्व या झगमगत्या दुनियेपासून थोडा दूर राहतो. दिव्याच्या पतीचा मनोरंजन जगताशी संबंध नाही. पण तो दिव्याबरोबर अनेक इव्हेंट्सना हजेरी लावत असतो. काही दिवसांपूर्वीच ते दोघेही एकत्र एका कार्यक्रमात दिसले होते, पण आता अचानक दोघांनी फोटो हटवल्याने हा पब्लिसिटी स्टंट आहे की दोघांमध्ये बिनसलंय अशा चर्चा होत आहेत.

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने केलं दुसरं लग्न, हिना खानने लावली हजेरी, ‘तो’ फोटो व्हायरल

अपूर्व पाडगांवकर काय करतो?

दिव्या अग्रवालचा पती अपूर्व उद्योजक आहे. तसेच तो इंजिनिअरदेखील आहे. त्याने एमबीएही केलं आहे. त्याची मुंबईत चार रेस्टॉरंट आहेत. वाशीतील ‘द टाइट पब’ आणि ‘सोया स्ट्रीट’, वांद्र्यात ‘लेमन लीफ’ व ‘येलो टँग’ रेस्टॉरंट्सचा तो मालक आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ५६ हजार फॉलोअर्स आहेत. त्याला कुत्र्यांची खूप आवड आहे. तो महिलांसाठी मास्टर क्लास चालवतो. ज्यामध्ये तो स्वयंपाक करण्यापासून पेंटिंगपर्यंतच्या विविध गोष्टी शिकवतो.