‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत बबिताचं पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजेच राज अनादकट यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचं वृत्त नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. साखरपुड्याच्या या व्हायरल बातमीवर मुनमुन व राजकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

बबिता फेम मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांनी काही दिवसांआधी गुजरात येथील वडोदरामध्ये साखरपुडा उरकल्याचं वृत्त न्यूज 18 या वृत्तवाहिनीकडून देण्यात आलं होतं. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं अभिनेत्रीने निवेदन जारी करत स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : Video: मंत्र्याच्या मुलाशी लग्न करून संसारात रमली अभिनेत्री, लवकरच दुसऱ्यांदा होणार आई, व्हिडीओ केला शेअर

“एकदम वाईट आणि हास्यास्पद! या व्हायरल बातमीत काहीच तथ्य नाही. मी अशा खोट्या बातम्यांवर माझा वेळ आणि शक्ती वाया घालवणार नाही.” असं मुनमुनने तिच्या निवेदनात म्हटलं आहे. याशिवाय “सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी ही पूर्णपणे खोटी आणि अर्थहीन असून, यावर कोणीही विश्वास ठेऊ नका” असं स्पष्टीकरण राज अनादकटच्या टीमकडून इन्स्टाग्रामवर देण्यात आलं आहे.

हेही वाचा : उषा मंगेशकरांना ‘झी मराठी’चा ‘जीवन गौरव’, तर ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कारावर ‘या’ अभिनेत्रीने कोरलं नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
raj
राज अनादकट

दरम्यान, २०१७ मध्ये अभिनेता भव्या गांधीच्या जागी या शोमध्ये टप्पूच्या भूमिकेसाठी अभिनेता राज अनादकटची वर्णी लागली होती. तर मुनमुन सुरुवातीपासून या मालिकेचा एक भाग आहे. तिला आता घरोघरी बबिता अशी ओळख मिळाली आहे.