Muramba Fame Shivani Mundhekar Talk’s About Coactor Aditi Sarangdhar : शिवानी मुंढेकर सध्या चर्चेत आहे ते तिच्या ‘मुरांबा’ मालिकेमुळे. या मालिकेने सात वर्षांचा लिप घेतल्याचं पाहायला मिळत आहे. लिप घेण्यापूर्वी त्यामध्ये अभिनेत्री अदिती सारंगधरची एन्ट्री झाली होती. अशातच आता या दोघींनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये शिवानीने अदितीसह काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला आहे.
अदिती यामध्ये इरावती ही भूमिका साकारत आहे. इरावती रमा-अक्षयला संकटात टाकण्याच्या, तसेच त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असते. अशातच आता या दोघींनी नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी एकमेकींसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. रमानं म्हणजेच शिवानीनं यावेळी ती सुरुवातीला अदितीला घाबरायची, असं सांगितलं आहे.
शिवानी मुंढेकरने सांगितला अदिती सारंगधरसह काम करण्याचा अनुभव
अदितीबद्दल शिवानी म्हणाली, “ही आल्यापासून मी खूप नवीन गोष्टी शिकली आहे. सुरुवातीला मी तिला घाबरूनच असायचे.” पुढे शिवानीनं अदिती व ती सेटवर खूप गप्पागोष्टी करीत काम करीत असल्याचं सांगितलं आहे. ती म्हणाली, “सीन सुरू झाला की, ही खूप विनोद करत असते. असं दिवसभर सुरूच असतं.”
अदिती पुढे शिवानीच्या उत्तराला प्रत्युतर देत म्हणाली, “हा माझ्यासाठी पहिलाच असा शो आहे, जिथे माझी एन्ट्री नंतर झाली आहे. आपण जेव्हा पहिल्या दिवसापासून शूटिंग करीत असतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की, हे हे लोक मालिकेत आहेत. मग हळूहळू काम करत जातो; पण इथे तसं नव्हतं. इथे या मालिकेची कथा खूप पुढे गेली होती.”
अदितीला मुलाखतीमध्ये शिवानीसह काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर अदिती म्हणाली, “मला तिची एनर्जी मॅच करायला वेळ लागला. अनेक नवीन मुली इंडस्ट्रीत आल्या आहेत. त्या छान काम करीत आहेत; पण मला याची काळजी वाटते की, जर ती एनर्जी मॅच नाही झाली, तर काय करयाचं? मी सुरुवातीला शिवानीच्या रूममध्ये बसायचे नाही. सेटवर वेगळी रूम आहे तिथे असायचे; पण हळूहळू कळलं की, अरे, हे लोक आपल्यासारखेच आहेत. मग नंतर मी शिवानीच्या मेकअप रूममध्ये आले.”