Muramba Upcoming Twist: ‘मुरांबा’ या मालिकेत आता रमा आणि अक्षयचे कुटुंब एक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जरी रमा आणि अक्षय मनापासून एकत्र आले नसले तरी आरोहीमुळे ते एका घरात राहत आहेत. रमाच्या अनुपस्थितीत इरावतीने मुलांना काही वाईट सवयी लावल्या आहेत.

मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी रमा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच, ती आता इरावतीलादेखील धडा शिकवणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

रमा शिकवणार इरावतीला धडा

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, इरावती घरातील तिन्ही मुलांना मोबाईल देत आणि त्यांना सांगते की, हे मोबाईल घ्या आणि जोरजोरात आरडाओरडा करत खेळण्यापेक्षा मोबाईलवर गेम खेळा. मजा करा. म्हणजे मला शांत झोप लागेल. इरावतीचे बोलणे रमा ऐकते.

रमा मनातल्या मनात म्हणते की, या शांततेची किंमत फार मोठी आहे. मुलांचे डोळे आणि मान दोन्ही खराब होतील. त्यावर काहीतरी उपाय करायला हवा. त्यानंतर प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जेव्हा इरावती आरशासमोर जाते. तेव्हा स्वत:लाच आरशात पाहून घाबरते. तिच्या डोळ्यांभोवती काळा रंग असल्याचे दिसत आहे. माझ्या डोळ्याला काजळ कोणी लावलं, असं ती म्हणते. त्यानंतर तिला पाहून आरोही किंचाळते. रडत म्हणते की, तू तर विदूषक आहेस. त्यानंतर रमा म्हणते की, जास्त मोबाईल पाहिल्यानंतर डोळ्यांखाली असं काळं होतं. म्हणून जास्त मोबाईल बघायचा नाही.

पुढे ती इरावतीला म्हणते, “मी आधीची रमा नाहीये; आरोहीची आई आहे. आता फक्त डोळे काळे केले आहेत. इथून पुढे माझ्या मुलीला वाईट सवयी लावण्याचा प्रयत्न केला, तर तोंड काळं करेन.” रमाचे शब्द ऐकल्यानंतर इरावती घाबरली असू,न रमा हसत असल्याचे पाहायला मिळते.

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, ‘रमा शिकवणार इरावतीला चांगलाच धडा’, अशी कॅप्शन दिली आहे. आता इरावती पुढे काय करणार, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.