Muramba upcoming twist: ‘मुरांबा’ या मालिकेतील रमा, अक्षय व माही या त्रिकुटाच्या आयुष्यात सतत काही ना काही सुरू असल्याचे दिसत आहे. रमासारखीच दिसत असल्याचा गैरफायदा घेऊन माही अक्षयच्या आयुष्यात आली आहे.
याबरोबरच, इरावतीच्या मदतीने कुटुंबाला इजा पोहोचवण्याची धमकी देऊन, तिने रमाला तिचे बाळ दवाखान्यातच सोडून तिथून जायला सांगितले. त्यानंतर रमा तिच्या बाळाला सोडून गेल्याचे पाहायला मिळाले. ती सध्या साईच्या घरी आहे. मात्र, रमा तिच्या बाळाला आणि अक्षयला स्वेच्छेने सोडून गेली आहे, यावर अक्षयचा विश्वास बसत नाही.
आता अक्षय व रमा यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी इरावती प्रयत्न करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
अक्षय आणि रमा यांच्यात येणार दुरावा
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, इरावती अक्षयला म्हणते, “अक्षय, रमा आणि साई यांच्यात काहीतरी शिजतंय”, त्यावर अक्षय इरावतीला स्पष्ट शब्दांत सांगतो की, माझा यावर विश्वास नाही. त्यानंतर इरावती आणि अक्षय साईच्या घरी जातात. त्यावेळी आजारी असलेल्या रमाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी साई उचलून घेऊन कारमध्ये बसवतो.
ते पाहून इरावती अक्षयला म्हणते, “बघ अक्षय मी तुला काय म्हणत होते…”, त्यावर अक्षय तिला सांगतो, “तरीही मला काहीतरी गडबड वाटतेय” तितक्यात साई गाडी सुरू करतो. त्याची गाडी पुढे जाते. अक्षय गाडीच्या मागे धावतो. तो रमा, असे म्हणून जोरात ओरडतो. रमाला अक्षय तिथेच आसपास असल्याची जाणीव होते. ती अक्षय, असे म्हणते. पण, साई तिला म्हणतो की, रमा तुम्ही त्याला आता विसरा. तो तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, रमा-अक्षयच्या नात्यात आणखी दुरावा येणार…, अशी कॅप्शन दिली आहे. प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याचे कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
“बाळ झाल्यानंतर अक्षय-रमा एकत्र येतील, असं वाटलं होतं”, “अक्षय रमावर असा अविश्वास दाखवू शकत नाही, त्याचं प्रेम आहे ना रमावर आणि त्याला रमा कशी आहे हे माहीत नाही का? असा कसा तो इरावतीच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो? अक्षयनं खरं काय हे शोधून काढलं पाहिजे. साईनं फोन करून, त्याला सगळं सांगायला हवं आणि रमाचे हाल आता बघवत नाही. बास करा. आता त्या इरावतीचं सत्य अक्षयला कळू दे. अक्षय तू रमाला लवकरात लवकर घरी घेऊन ये. रमा आणि अक्षयला एकत्र आणा”, “रमा आणि अक्षय दूर व्हायला ते मालिकेत कधी एकत्र दाखवलेच नाहीत”, “सीमाला सगळं माहीत आहे. तरी ती गप्प आहे. खरंच मूर्ख बाई दाखवली आहे”, “थोडे तरी चांगले क्षण दाखवा की”, “काय फालतूगिरी आहे”, “मालिका बघण्याचा रस निघून गेला”, “ही फालतूगिरी थांबवा”, अशा अनेक कमेंट्स पाहाय़ला मिळत आहेत.







दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.