Muramba Upcoming Twist: मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांची मालिकेतील उत्सुकता टिकवून ठेवतात. मालिकेत पुढे काय होणार, आपल्या आवडत्या नायक-नायिकांच्या आयुष्यात नेमकं काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
आता मुरांबा या मालिकेत नवीन वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. रमा आणि अक्षयचे आयुष्य संपूर्णपणे बदलले आहे. रमा उच्च पदावर काम करीत आहे; तर अक्षय तिच्या कंपनीत काम करत आहे.
अक्षयला ती रमाची कंपनी असल्याची कल्पना नसल्याने त्याने कुकचे काम स्वीकारले आहे. आता रमा आणि अक्षय एकमेकांसमोर येणार आहेत. समोर आलेल्या मालिकेच्या प्रोमोमध्ये त्याची झलक पाहायला मिळत आहे. त्यांची मुलगी आरोही हिच्यामुळे रमा आणि अक्षय सात वर्षांनंतर पहिल्यांदा एकमेकांना भेटणार आहेत.
रमा-अक्षयची भेट होणार
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रमा व अक्षयची मुलगी दहीहंडीच्या कार्यक्रमात दहीहंडी फोडण्यासाठी वर चढते. तिने श्रीकृष्णाचा पेहराव केल्याचे पाहायला मिळते. हंडी फोडल्यानंतर खाली उतरताना तिचा पाय घसरतो. ती आई, अशी मोठ्याने ओरडते.
जवळच उभी असलेली रमा आरोहीला पडताना पाहते. ती पळत तिला धरण्यासाठी येते. ती खाली पडत असलेल्या आरोहीला अलगद हातांत झेलते. अक्षयदेखील आरोहीचा आवाज ऐकून घटनास्थळी पळत येतो. तो आरोहीला म्हणतो की, तू बरी आहेस ना? तुला लागलं नाही ना? तितक्यात त्याची नजर समोर जाते. त्याच्या मुलीला वाचवणारी स्त्री त्याला दिसते. तो तिला पाहून रमा, असे आश्चर्याने म्हणतो; तर रमाच्या चेहऱ्यावर भीती दिसते.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने ‘अखेरीस तो क्षण येणार, रमा-अक्षयची भेट होणार’, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी त्यांना पुन्हा एकत्र आणा, अशी विनंती कमेंट्स करीत केली आहे.
“प्लीज त्यांना एकत्र आणा”, “आता तरी त्या तिघांना एकत्र आणा”, “एकत्र येण्याचा योग जवळ येतोय”, “रमा-अक्षय एकत्र आलेले लवकर दाखवा”, “त्यांना एकत्र आणा, इरावतीला अद्दल घडवा आणि एकदाची मालिका संपवा”, “त्या तिघांना एकत्र आणा आणि इरावतीचे सत्य अक्षयसमोर येऊ दे”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत.





दरम्यान, आता रमा समोर आल्यानंतर अक्षय नेमकं काय करणार, सात वर्षांनंतर रमाला समोर पाहून त्याची नेमकी प्रतिक्रिया काय असणार, इरावतीचे सत्य त्याच्यासमोर कधी येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.