Navari Mile Hitlerla Fame Actress Shared Childhood Memory : अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामार्फत ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी तसेच कामासंबंधित अपडेट शेअर करीत प्रेक्षकांच्या संपर्कात राहतात. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच तिच्या बालपणीची आठवण शेअर केली आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्रीने प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्यामध्ये लक्ष्मी हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच सानिका काशिकर. सानिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती यामार्फत तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. आता नुकतीच तिने तिच्या बालपणीची आठवण चाहत्यांसह शेअर केली आहे.

सानिका काशिकरने सांगितली बालपणातील आठवण

सानिकाने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ हे सत्र घेतलं होतं. त्यामध्ये तिला अनेकांनी प्रश्न विचारले होते. त्यादरम्यान एका चाहत्यानं तिला ‘तुझ्या बालपणातील आठवणींबद्दल काहीतरी सांग’, असं सांगितलं होतं. त्यावर ती म्हणाली, “मी ब्राह्मण समाजात वाढले, त्यामुळे माझं बालपण थोडं शिस्तीचं होतं. तेव्हा मला वडिलांची खूप भीती वाटायची; पण आता जाणवतं की, ते सगळं माझ्या भल्यासाठीच होतं..”

सानिकानं यावेळी तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती तिच्या वडिलांबरोबर असल्याचं पाहायला मिळतं. सानिकाला याव्यतिरिक्त “तुला खायला काय आवडतं?” असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिनं तिच्या आईनं बनवलेलं काहीही, असं उत्तर दिलं. यावेळी तिला ‘नवरी मिळे हिटलरला’मधील कलाकारांबद्दलही विचारण्यात आलं होतं. सानिकानं त्या सर्वांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करीत प्रश्नांची उत्तरं दिली.

सानिका काशिकरने शेअर केला बालपणातील फोटो

सानिकाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ती अनेकदा तिचे हटके फोटोशूट यामार्फत पोस्ट करीत असते. तिनं शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओंवर तिचे चाहते लाइक व कमेंट्सचा वर्षाव करीत असतात.

सानिका काशिकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं ‘मनमौजी’, ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘सिंगल’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. त्यासह अभिनेत्रीनं ‘काव्यांजली’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘झी मराठी’वरील ‘नवरी मिळे हिटलरला’मधील तिच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. नुकतीच ती याच वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून पाहायला मिळाली.