Navari Mile Hitlerla Fame Vallari Viraj Talks about Sharmila Shinde : अभिनेत्री वल्लरी विराज सोशल मीडियावर सक्रिय असते. यामार्फत ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट चाहत्यांसह शेअर करत असते. यासह ती नृत्य करतानाचे तिचे व्हिडीओही शेअर करत असते. वल्लरी अभिनयासह उत्तम नृत्यसुद्धा करते. तिने शेअर केलेल्या रीलला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असतो, तर तिच्या बहुतांश रीलला मिलियनमध्ये व्ह्युज असतात.

वल्लरीने नुकतंच सोशल मीडियावर ‘आस्क मी सेशन’ घेतलं होतं. यामार्फत तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले; तर वल्लरीनेही तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. वल्लरीला या सेशनमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले. या दरम्यानच अभिनेत्रीला तिची सहकलाकार अभिनेत्री शर्मिला शिंदे म्हणजेच ‘नवरी मिळे हिटलरला’मधील दुर्गाबद्दल विचारण्यात आलं होतं. तिच्या एका चाहत्यानं तिला ‘तुझं आणि शर्मिला ताईचं नातं कसं आहे?’ असा प्रश्न विचारला होता.

वल्लरीने या प्रश्नाचं उत्तर देत शर्मिलाबरोबरचा मालिकेतील फोटो शेअर करत म्हटलं की, “तिच्याबरोबर काम करताना खूप मज्जा आली. एकदाही निराशा जाणवली नाही.” वल्लरी व शर्मिला यांनी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सासू व सुनेची भूमिका साकारली होती. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान या दोघी अनेकदा एकमेकींबरोबरचे अनेक रील व्हिडीओ शेअर करत असायच्या.

वल्लरी विराजची इन्स्टाग्राम स्टोरी

यासह ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील सर्व कलाकार मंडळी अनेकदा एकमेकांसह गाणी, डान्स, विनोदी संवाद यावर रील बनवत असत. त्यांच्या या रीलवर प्रेक्षक लाईक व कमेंट्सचा वर्षाव करायचे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एजे-लीला या जोडीची हटके लव्हस्टोरी, जहागीरदार कुटुंबीय आणि त्यांच्यामध्ये रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. अभिनेत्री वल्लरी विराज व अभिनेता राकेश बापट यामध्ये मुख्य भूमिकेत झळकले होते, तर या दोघांव्यतिरिक्त मालिकेत अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.