Navari Mile Hitlerla Fame Vallari Viraj Praises Costar Sharmila Shinde : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका होती. अवघ्या कमी कालावधीत मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला. त्यामध्ये वल्लरी विराजने मुख्य भूमिका साकारलेली. अशातच तिने यातील तिची सहअभिनेत्री शर्मिला शिंदेबद्दल सांगितलं आहे.

वल्लरी विराजने मालिकेत लीला, तर शर्मिलाने मालिकेत दुर्गा हे पात्र साकारलं होतं. मालिकेत शर्मिला वल्लरीची सून होती. पण, खऱ्या आयुष्यात मात्र वल्लरी शर्मिलापेक्षा लहान असून, तिने तिच्या ऑनस्क्रीन सुनेबद्दल कौतुक केलं आहे. आज ३ ऑगस्ट मैत्री दिनानिमित्त तिने त्यांच्या सेटवरील आठवणींना उजाळा देत, त्यांच्या ऑफस्क्रीन बाँडबद्दलची माहिती दिली आहे.

वल्लरी विराजने केलं शर्मिला शिंदेचं कौतुक

वल्लरीने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना याबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी आणि शर्मिलाताई या मालिकेनिमित्तच पहिल्यांदा भेटलो. पण, पहिल्या भेटीतच नकळतच आम्ही एकमेकांना आपलंसं केले. सेटवर सगळ्यांची काळजी घेणं, प्रत्येकाशी आपुलकीनं वागणं, हे तिचं खास वैशिष्ट्य. मला तिच्यासोबत काम करताना, सीन करताना फार मजा यायची. कारण- ती फारच ताकदीची अभिनेत्री आहे.”

वल्लरी पुढे म्हणाली, “त्यामुळे तिच्यासोबत सीन करताना नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या. आमचे भांडणाचे वगैरे सीन शूट झाल्यानंतर सीन कट झाला की, आम्ही लगेच एकमेकींना छान मिठ्या मारायचो आणि हसत म्हणायचो, हा फक्त अभिनय आहे, असं खरं काही नाहीये. ती उत्तम स्वयंपाक करते. त्यामुळे ती माझ्यासाठी छान छान पदार्थ करून आणायची. मी तिला शर्मिलाताई म्हणते आणि ती मला लाडाने वल्ला म्हणते, अशी आमची खूप सुंदर मैत्री आहे आणि खूप घट्ट असा बाँड आहे. ती मला मोठ्या बहिणीसारखी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वल्लरी विराज व शर्मिला शिंदे यांनी ‘नवरी मिळे हिटलर’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामधील त्यांची ऑनस्क्रीने केमिस्ट्री फार रंजक होती. सुनेपेक्षा वयाने लहान असलेली सासू असे काहीसे या मालिकेत दाखवण्यात आलेले. अवघ्या कमी कालावधीतच यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ ही वल्लरी विराजची पहिलीच मालिका होती. त्यामध्ये तिने पहिल्यांदाच मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. त्यामध्ये तिला मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मालिकेतील लीला या तिच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.