Navari Mile Hitlerla Fame Vallari Viraj Shared A Post : वल्लरी विराज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून तिनं मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. वल्लरी सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो व रील पोस्ट करीत असते. अशातच अभिनेत्रीने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून अनेक प्रसिद्ध कलाकारांसह काही नवीन चेहरेसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यातलीच एक म्हणजे मालिकेत रेवतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आलापिनी निसळ. वल्लरी व आलापिनी यांनी या मालिकेत बहिणींच्या भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेदरम्यान दोघींची ओळख झाली आणि आता त्या एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत.
आलापिनीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तच वल्लरीने सोशल मीडियावर तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. वल्लरीने यामधून तिचे व आलापिनीचे काही खास फोटो शेअर करीत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वल्लरीने या पोस्टला खास कॅप्शनही दिली आहे.
वल्लरीने पोस्ट शेअर करीत त्यामधून असं म्हटलं, “ती कायम मला पाठिंबा देते. अगदी रात्रीचे २ वाजताही मी तिच्याशी बोलू शकते. ती खूप खरी, ड्रामेबाज, विनोदी व समजूतदार आहे. तुला पुस्तकांची आणि कॉफीची कधीच कमी पडू नये. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं नसतं”.
वल्लरी व आलापिनी या दोघी अनेकदा सोशल मीडियावरुन एकमेकींबरोबरचे रील व व्हिडीओ पोस्ट करत असतात. दोघींनाही अभिनयासह नृत्याची विशेष आवड असल्याचे पाहायला मिळते. तर अनेकदा या दोघी त्यांच्या डान्स रील इन्स्टाग्रामवरून पोस्ट करीत असतात. दोघींच्या या रीलला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो.
दरम्यान, वल्लरी विराजच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं मराठीसह हिंदीतही काम केलं आहे. वल्लरीने ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेपूर्वी ‘मैं लडेगा’ या हिंदी चित्रपटात काम केलं होतं. त्यासह तिने ‘कन्नी’ या मराठी चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यामधून ती अभिनेत्री ह्रता दुर्गुळे व अजिंक्य राऊतसह झळकली होती. परंतु, वल्लरी खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ते ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील तिच्या लीला या भूमिकेमुळे.