Navri Mile Hitlerla fame actress Aalapini Nisal: ‘नवरी मिळे हिटलरला ‘या मालिकेतून अभिनेत्री आलापिनी निसळने प्रेक्षकांच्या मनात तिची जागा निर्माण केली. या मालिकेत तिने रेवती ही भूमिका साकारली होती.

लीला व रेवती या बहि‍णींची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या, एकमेकींची काळजी घेणाऱ्या लीला व रेवती घराघरांत पोहोचल्या होत्या. आता मालिका संपल्यानंतरही या दोन्ही अभिनेत्री त्यांच्या डान्स व्हिडीओंच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

विविध गाण्यांवर उत्तम हावभाव दाखविणाऱ्या या अभिनेत्रींच्या डान्स व्हिडीओंना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते. आता आलापिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आलापिनीचे ‘हे गजवदन’ गाण्यावर सुंदर सादरीकरण

या व्हिडीओमध्ये तीने जाभळ्या रंगाची साडी नेसली आहे. पारंपरिक पेहरावात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिनं हे गजवदना या गाण्यावर सुंदर सादरीकरण केलं आहे. तिच्या सादरीकरणातील स्टेप्स, हावभाव हे लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिनं गणपती बाप्पा मोरया, असं लिहिलं आहे.

तिच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करीत तिचं कौतुक केलं आहे. “सुंदर”, “तुमचे रील्स नेहमी वेगळे आणि ग्रेसफुल असतात”, “खूप सुंदर, गणपती बाप्पा मोरया”, “खूप छान हावभाव”, “आतापर्यंचा सर्वांत सुंदर डान्स” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

आलापिनीने याआधीही अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. वल्लरी विराजबरोबच्या तिच्या डान्स व्हिडीओंनादेखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्री कायमच एक वेगळी संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे व्हिडीओ आवडतात.

दरम्यान, आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेनंतर आलापिनी निसळ कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.