Navri Mile Hitlerla fame Actresses Dance Video: आजच्या काळात कलाकार हे फक्त चित्रपट, नाटक किंवा मालिका या माध्यमातूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, असे नाही. सोशल मीडिया हे मनोरंजनाचे नवीन माध्यम म्हणून समोर आले आहे.
सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्याचा उपयोग सामान्य व्यक्तींपासून ते प्रसिद्ध, अब्जाधीश व्यक्तींपर्यंत सर्वजण करू शकतात. शिक्षणाशी निगडीत, व्यावसायिकदृष्ट्या तसेच मनोरंजनासाठी या सोशल मीडियाचा विविध पद्धतीने वापर केला जातो.
अनेक सामान्य व्यक्ती या सोशल मीडियामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहेत. त्यांच्यात असलेल्या टॅलेंटद्वारे ते चाहत्यांचे मने जिंकताना दिसतात. विनोद, डान्स, गाणी, विविध प्रयोग, शेती, भटकंती, गड-किल्ले अशा अनेक विध विषयांवर आधारित व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले जातात. पडद्यावर दिसणारे कलाकारदेखील या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
‘छैल छबिली’ गाण्यावर ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रींचा डान्स
आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील अभिनेत्रींचा एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री सानिका काशिकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील लीला, रेवती, दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती एकत्र दिसत आहे. त्यांनी छैल छबिली या गाण्यावर डान्स केला आहे.
नेटकरी काय म्हणाले?
एका ठिकाणी थांबून फक्त हातांची हालचाल करत त्यांनी सुंदर परफॉर्मन्स सादर केला आहे. त्यांचे हावभाव तसेच हातांची हालचाल लक्षवेधी आहे. त्यांचा हा डान्स पाहून चाहत्यांनी कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले आहे. “जहागिरदारांच्या सगळ्या मुली सुंदर आहेत”, “सुंदर”, “छान”, “जहागीरदार गर्ल्स रॉक”, “किती सुंदर”, “अगं बाई”, “माझ्या सुंदर मुली”, “हावभाव हातांची हालचाल खूप सुंदर”, “तुमच्या सगळ्यांची ऊर्जा खूप छान आहे. सगळ्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव सुंदर आहेत”, अशा अनेक कमेंटस् पाहायला मिळत आहेत.





नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाच्या भूमिकेत अभिनेत्री वल्लरी विराज, लक्ष्मीच्या भूमिकेत सानिका काशिकर, सरस्वतीच्या भूमिकेत भूमिजा पाटील, रेवतीच्या भूमिकेत आलापिनी तसेच दुर्गाच्या भूमिकेत अभिनेत्री शर्मिला शिंदे दिसत आहेत.
दरम्यान, सध्या मालिकेत एजेची पहिली पत्नी अंतरा परत जहागिरदारांच्या आयुष्यात आली आहे. त्यामुळे एजे व लीला एकमेकांपासून दुरावतील अशी त्यांच्या सुनांना अपेक्षा आहे. एजे मात्र लीलाबरोबर ठामपणे उभे असल्याचे दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार आणि मालिकेचा शेवट काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.