Vallari Viraj shares dance video on Main Albeli song: ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’, ‘कन्नी’, ‘नवरी मिळे हिटलरला’, अशा मालिका, चित्रपट यांमधून अभिनेत्री वल्लरी विराजने मनोरंजनसृष्टीत तिची ओळख निर्माण केली आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून वल्लरी विराजने प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेत तिने लीला ही भूमिका साकारली होती. थोडी अल्लड, गोंधळ घालणारी पण तितकीच प्रेमळ, संकाटांना धाडसाने सामोरी जाणारी, कुटुंबासाठी काहीही करण्याची तयारी असणारी लीला प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. याबरोबरच, लीला व एजे यांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

आता या मालिकेनंतर अभिनेत्री कोणत्या मालिकेतून अथवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. दरम्यानच्या काळात वल्लरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसते. अभिनयाबरोबरच तिला नृत्याचीदेखील आवड असल्याचे दिसते.

वल्लरी विराज सोशल मीडियावर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनेकदा तिच्याबरोबर अभिनेत्री आलापिनीदेखील दिसते. आलापिनी आणि वल्लरीने मालिकेत बहि‍णींची भूमिका साकारली होती. मालिकेदरम्यान त्यांच्यात उत्तम मैत्री झाल्याचे पाहायला मिळते. याबरोबरच, त्यांच्या एकत्रित डान्स व्हिडीओंना प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळताना दिसते. त्यांचे हावभाव चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मैं अलबेली’ या गाण्यावर तिने सुंदर डान्स केला आहे. या गाण्यावरील डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना फायनल व्हिडीओपेक्षा प्रॅक्टिस व्हिडीओ जास्त आवडला अशा आशयाची कॅप्शन लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Vallari Viraj (@vallari_20)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकरी काय म्हणाले?

वल्लरीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. “एक्सप्रेशन क्वीन”, “डान्स क्लाससाठी कधी येऊ”, “खूप सुंदर डान्स. तू मला खूप आवडतेस”, “तू डान्स क्वीन आहेस”, “सुंदर”, “वाह”, “वल्लरी ताई, तुझा डान्स खूप छान आहे. मला तुझ्या डान्स रील्स खूप आवडतात आणि मी त्या पुन्हा पुन्हा बघत असते”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

आता वल्लरी आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.