scorecardresearch

Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील स्वराला मिळणार नवी ओळख पण…

Tuzech Mi Geet Gaat Aahe
'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतील स्वराला मिळणार नवी ओळख पण… (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सध्या सर्वच मालिकांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका. या मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात या मालिकेनं टेलिव्हिजन टीआरपीच्या यादीत ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला मागे टाकतं तिसऱ्या क्रमांकाच स्थान मिळवलं होतं. अशातच या मालिकेत आणखी मोठा नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

हेही वाचा – “ती जागा हाफ चड्डीची नाही”, गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रात…”

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

गेले कित्येक महिने प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर मालिकेत काही दिवसांपूर्वीच आला. स्वराज आणि पिहू रक्षाबंधन साजरी करत असताना मल्हारसमोर स्वराज मुलगी असल्याचं सत्य उघड झालं. तेव्हापासून मल्हार स्वराला कसा स्वीकारतोय आणि तो स्वरा पुढे आपलं नाव लावणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहीलं होतं. पण आता यामध्ये ट्विस्ट आला आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप लवकरच ‘या’ चित्रपटात झळकणार; प्रथमेश परब असणार जोडीला

स्वराला आता नवी ओळख मिळणार तर आहेत. पण ती स्वरा मल्हार कामत नसून स्वरा शुभंकर ठाकूर अशी ओळख मिळणार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या नव्या प्रोमोमधून ही गोष्ट समोर आली आहे. या नव्या प्रोमोमध्ये, मल्हार स्वराला म्हणतोय की, ‘आता स्वराला तिचे बाबा मिळणार आहेत.’ यावेळी स्वरा मनातल्या मनात म्हणते की, ‘बाबा आता सगळ्यांना सांगू टाका की, तुम्हीच माझे बाबा आहात.’ तितक्यात मल्हार म्हणतो की, ‘आजपासून जग हिला स्वरा शुभंकर ठाकूर या नावाने ओळखेल.’ यावेळी स्वराला आश्चर्याचा धक्का बसतो.

हेही वाचा – Video: अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंच्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाले, “दादा एक…”

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, आता मालिकेत या नव्या ट्विस्टनंतर पुढे काय होणार? मल्हारसमोर मोनिका आणि शुभंकरच्या नात्याचं सत्य कधी उलगडणार? पिहू ही शुभंकरची खरी मुलगी असल्याचं कधी समोर येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 11:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×