स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. अल्पवधीच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अशात मालिकेत लवकर मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सतत भांडणे व रुसवे फुगवे सुरु असणाऱ्या कोळी कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या भागात आपण बघितलं की सकाळी सगळ्यांसाठी जेवण तयार करत असताना मुक्ता स्वातीकडे चिंच मागते. अन् तेवढ्यातच मुक्ताला उलटी आल्यासारखी होते. त्यामुळे ती तिच्या खोलीत पळते. मुक्ताला होत असलेल्या उलट्या बघून स्वातीच्या मनात गैरसमज निर्माण होतो. मुक्ता व सागर आई-बाबा होणार असल्याचा विचार करत स्वातीला खूप आनंद होतो व ती ही बातमी घरातली सगळ्यांना सांगते.
हेही वाचा- लग्न कधी करणार? जुई गडकरी उत्तर देत म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
दरम्यान प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नव्या भागात कोळी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदात नाचताना दिसत आहे. स्वातीने मुक्ता व सागरची दिलेली गुडन्यूज ऐकूण घरातील सगळेजण खूश होतात. व सगळेजण मुक्ता व सागरचे अभिनंदन करु लागतात. मात्र, सागर व मुक्ताला याचा खूप मोठा धक्का बसतो. मुक्ता सगळ्यांना खरे सांगण्याचा प्रयत्न करते मात्र, तिचे कोणी ऐकूणच घेत नसते. तेवढ्यात इंद्रा खोलीतून बाहेर येते. मुक्ता व सागरची बातमी ऐकल्यानंतर तीही खूष होते पण दुसऱ्या मिनिटाला तिच्या लक्षात येते की मुक्ता कधीच आई होऊ शकणार नाही. आणि हे इंद्रा पटकन बोलून जाते.
इंद्राच्या या शब्दाने मुक्ता दुखावते. यावेळी सईने तिचा हात घट्ट पकडलेला असतो. सईला बाजूला बसलेले बघून मुक्ता म्हणते, कोण म्हणालं मी आई होऊ शकत नाही. मी आई झाली आहे सईची. आणि ते माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. मुक्ताच्या या बोलण्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येते.