Nikki Tamboli Support Arbaaz Patel : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून चर्चेत आलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. निक्की आणि अरबाज यांनी याआधी काही हिंदी रिअ‍ॅलिटी शो केले होते. त्यानंतर त्यांनी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला. या शोमधील दोघांच्या खेळाचं प्रेक्षकांनी कौतुकही केलं.

‘बिग बॉस मराठी’मध्ये निक्की-अरबाज एकमेकांना पाठिंबा देताना दिसले होते. ‘बिग बॉस’मध्ये असताना त्यांच्या नात्याविषयीच्या अनेक चर्चासुद्धा झाल्या. ‘बिग बॉस’ शो संपल्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र राहत असल्याचं पाहायला मिळालं आहे. नुकताच निक्कीनं तिचा वाढदिवस अरबाजबरोबर साजरा केला.

‘बिग बॉस मराठी ५’नंतर निक्की-अरबाज ही जोडी एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी ५’ गाजवल्यानंतर अरबाज ‘राइज अ‍ॅण्ड फॉल’ या हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे आणि निक्की त्याला ‘बिग बॉस’मध्ये असताना जसा पाठिंबा देताना दिसली, तसंच ती आता या शोमध्येही त्याला सपोर्ट करताना दिसत आहे.

मात्र, निक्कीने अरबाजला पाठिंबा दिल्यानं तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं आहे. पण निक्कीनेसुद्धा या ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अरबाजचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, अरबाज पटेल, माझा हिरो! असाच पुढे जा… कोण कुणाचा बाप आहे, हे आज कळलं. कदाचित काही लोक थोडं कमी डोकं आणि कमी हवाबाजी घेऊन शोमध्ये आले असते. गेम अगदी सोपा होता, पण नको तिथे केलेली हवाबाजीच त्यांना नडली.”

निक्कीने अरबाजला दिलेल्या या पाठिंब्यामुळे तिला ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिला ट्रोल करताना काही नेटकऱ्यांनी अपशब्द वापरले आहेत; पण निक्कीही शांत बसली नाही. तिनं ट्रोलर्सच्या कमेंट्सचा एक स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करीत त्यांना चांगलंच सुनावलं आहे. त्यात ती म्हणते, “मला शिव्या घालून काही होणार नाही… बाप तो बापच राहणार. आपला पराभव पचवायला शिका, चला आता हवा येऊ दे.”

निक्की तांबोळीबद्दल सांगायचं झाल्यास, ती नुकतीच Celebrity MasterChef India या कुकिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होती. त्यात ती पहिली रनर-अप ठरली. तसेच, गेल्या वर्षी निक्कीनं ‘बिग बॉस मराठी ५’मध्येही भाग घेतला होता. त्या शोमध्ये ती दुसरी रनर-अप ठरली. त्याच शोदरम्यान तिची आणि अरबाज पटेलची जवळीक वाढली. त्यानंतर दोघे अनेक कार्यक्रमांत एकत्र पाहायला मिळाले.