Star Pravah Shitti Vajali Re Show Nilesh Sabale Entry : हसताय ना हसायलाच पाहिजे…असं म्हणत डॉ. निलेश साबळेने गेली वर्षानुवर्षे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. निलेश व्यग्र शेड्युलमुळे यंदा ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात सहभागी होणार नाहीये. मात्र, अभिनेत्याने नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. निलेश साबळेची ‘स्टार प्रवाह’च्या रंगमंचावर एन्ट्री होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

स्टार प्रवाहचा लोकप्रिय कार्यक्रम ‘शिट्टी वाजली रे’चा महाअंतिम सोहळा २ आणि ३ ऑगस्टला जल्लोषात पार पडणार आहे. या महाअंतिम सोहळ्यात सेलिब्रिटी जोड्यांची धमाल अनुभवता येईलच पण खास आकर्षण ठरणार आहे ते निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधवची उपस्थिती. महाअंतिम सोहळ्यात हे दोन लोकप्रिय अभिनेते सहभागी होऊन धमाल करणार आहेत.

सिद्धार्थ जाधव लवकरच ‘आता होऊ दे धिंगाणा ४’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर निलेश साबळे ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमचं कौतुक करण्यासाठी आणि खास पदार्थांची चव चाखण्याकरिता महाअंतिम सोहळ्यात हजेरी लावणार आहे.

स्टार प्रवाहबरोबरचा हा पहिला कार्यक्रम असल्यामुळे निलेश साबळेही प्रचंड उत्सुक आहे. शिट्टी वाजली रे च्या मंचावर एन्ट्री घेण्याच्या या अनुभवाविषयी सांगताना निलेश साबळे म्हणाला, “स्टार प्रवाह वाहिनीबरोबरचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. स्टार प्रवाहचे अनेक कार्यक्रम मी पाहत आलोय. ‘आता होऊ दे धिंगाणा’ आणि ‘शिट्टी वाजली रे’ हे दोन्ही कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत. ‘स्टार प्रवाह’ने इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने जेव्हा या कार्यक्रमासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. ‘शिट्टी वाजली रे’च्या मंचावरचा दिवस माझ्यासाठी अतिशय गमतीदार ठरला. यामागचं कारण म्हणजे मला स्वयंपाक बनवता येत नाही पण माझ्यासह अभिनेत्री सुपर्णा श्याम होती. तिने मला मदत केली… त्यामुळे तिच्या साथीने मी पदार्थ बनवू शकलो. ‘स्टार प्रवाह’च्या कुटुंबात माझा प्रवेश झालाय त्यामुळे अतिशय आनंद होतोय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शिट्टी वाजली रे’चा महाअंतिम सोहळा म्हणजेच शेवटचा भाग २ आणि ३ ऑगस्टला रात्री ९ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित करण्यात येईल.