गेल्या काही दिवसांमध्ये मनोरंजन क्षेत्रात अनेक जोडप्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ‘पांड्या स्टोअर’फेम टीव्ही अभिनेता अक्षय खरोडियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. त्याच वेळी ‘कैसी ये यारियां’फेम टीव्ही अभिनेत्री नीती टेलरच्या घटस्फोटाच्या चर्चांनाही उधाण आले. या सगळ्याची सुरुवात तिने तिच्या नावामधील पतीचे आडनाव हटवल्यानंतर झाली. आता या प्रकरणावर नीतीने मौन सोडले आहे. तिने तिच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दलही वक्तव्य केले आहे.

‘माझं मौनच माझं उत्तर’

नीती टेलरने ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. परीक्षित बावा बरोबरच्या आपल्या नात्याबद्दल ती स्पष्टपणे बोलली. तिने सांगितले, “जेव्हा तुम्ही घटस्फोटाच्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा तीच तुमची प्रतिक्रिया असते.” तिने पुढे सांगितले, “जेव्हा काही झालेलंच नाही, तेव्हा मी त्या गोष्टींवर काय बोलणार? मी या गोष्टींवर स्वतःहून स्पष्टीकरण का देऊ? जेव्हा असं काही घडतच नाहीये, तर मी प्रतिक्रिया का द्यावी?”

हेही वाचा…Pushpa 2: अल्लू अर्जुनशी एकदाही भेट नाही, तोंडात कापूस ठेऊन डबिंग अन्…; श्रेयस तळपदेने सांगितला अनुभव, म्हणाला…

घटस्फोटाच्या बातम्यांमुळे त्रासली होती नीती

नीती पुढे म्हणाली, “मी आणि परीक्षित एकत्रच आहोत. जेव्हा घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या, तेव्हा मी थोडी त्रासले होते. पण, नंतर मला वाटलं की, माध्यमांमध्ये अशा बातम्या येतच असतात. मी माझ्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. मी आणि परीक्षित वेगळं होणार नाही आहोत.”

आडनाव का हटवले ?

नीतिने स्पष्ट सांगितले की, “जर मी माझ्या नावाच्या मागून परीक्षितचं आडनाव हटवलं, तर याचा अर्थ असा होत नाही की आम्ही वेगळं होत आहोत. मी हे माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्याने तेच कारण असल्याने केलं आहे. परीक्षितबरोबरचे माझे सर्व फोटो आजही माझ्या प्रोफाइलवर आहेत. आम्ही एकत्र आनंदी आहोत.”

हेही वाचा…चेहऱ्यावर गोड हास्य अन् ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर घेतला सेल्फी; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांचा फोटो Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२० मध्ये झाले होते नीति टेलर-परीक्षित बावाचे लग्न

नीती टेलरने २०२० मध्ये परीक्षित बावाबरोबर लग्न केले होते. लॉकडाउनच्या काळात हे लग्न झाले. या लग्नाला दोन्ही कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले होते. नीती टेलरच्या करिअरबद्दल सांगायचे, तर तिने खूप कमी वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पण, तिला खरी ओळख ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेमुळे मिळाली.