राज्यभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमध्ये ओंकार भोजने परतणार आहे. होय. तुम्ही बरोबर ऐकलं आहे. अचानक हा शो सोडणारा ओंकार याच शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शोमध्ये पुन्हा एकदा ओंकार भोजनेला पाहता येणार आहे. सोनी मराठीकडून एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यातून ओंकार पुन्हा शोमध्ये दिसणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडताना ओंकार भोजने काय म्हणाला होता? दिग्दर्शक म्हणाले, “तो खूप…”

सोनी मराठीने एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ओंकार भोजने दिसत आहे. “हास्यजत्रेत पुन्हा एकदा ओंकार भोजनेची धमाल… पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – सहकुटुंब हसू या! – दिवाळी स्पेशल,” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ओंकार प्रसाद खांडेकर, इशा, पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर स्किट करताना दिसत आहे.

ओंकार हास्यजत्रेत पुन्हा दिसणार हे कळताच चाहते व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. ‘वा वा लयभारी आता खरी मजा येणार, खूपच आंनद झाला बघून’, ‘आत्ता गौरव आणि ओंकार नुसता धिंगाणा’, ‘आता पुन्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा बघणार’, ‘आता आला आहे तर परत जाऊ देऊ नका’, ‘ओंकार तुला शोमध्ये खूप मिस केलं’, अशा प्रकारच्या कमेंट्स चाहते या व्हिडीओवर करत आहेत.

ओंकार भोजनेच्या मानधनाबाबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक म्हणाले, “तो स्वतः म्हणाला होता की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ओंकार भोजने येत्या शनिवार व रविवारच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. ओंकार यापुढे प्रत्येक एपिसोडमध्ये दिसेल की फक्त या दिवाळी स्पेशल एपिसोडसाठी आला आहे, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. पण व्हिडीओत ‘कधी नव्हे ते एकदाच आलोय’, असं म्हणताना तो दिसतोय त्यावरून तो फक्त दिवाळी स्पेशल एपिसोडमध्येच दिसू शकतो. पण ओंकार किंवा शोच्या निर्मात्यांनी माहिती दिल्याशिवाय ओंकारचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रवास केवढा असेल याबाबत सांगता येणार नाही.