Paaru Fame Prasad Jawade shares video: ‘पारू’ मालिकेत सध्या वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पारूच्या मंगळसूत्राबद्दल आदित्यला समजले आहे. तर दिशा सतत पारूला त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे. पारूबरोबरच दिशा मारुतीचा अपमान करत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्याचा ती छळ करत असल्याचेदेखील समोर आले.

आता पारू व आदित्यच्या नात्याबद्दल अहिल्यादेवी किर्लोस्करला कधी समजणार आणि त्यांचे नाते ती स्वीकारणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणेने साकारली आहे. अभिनेता प्रसाद जवादे हा आदित्य या भूमिकेत दिसत आहे. तर दिशा या भूमिकेत अभिनेत्री पूर्वा शिंदे दिसत आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर या भूमिकेत मुग्धा कर्णिक दिसत आहे.

‘पारू’ फेम प्रसाद जवादेने शेअर केला व्हिडीओ

हे कलाकार जितके मालिकेमुळे चर्चेत असतात. तितकेच ते सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील चर्चेत असतात. चाहते त्यांना फोटो, व्हिडीओ यांच्यावर कमेंट करत त्यांना दाद देतात. आता अभिनेता प्रसाद जवादेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने हिरव्या रंगाचा कुर्ता घातल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने पूर्वा शिंदेने व्हिडीओ काढल्याचे लिहिले आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुखनेदेखील यावर कमेंट केली आहे. पूर्वाला टॅग करत तिने लिहिले, “ही जी समाजसेवा तू करतेयस”, असे लिहित पुढे भावुक झाल्याच्या इमोजी शेअर केल्या. त्यावर पूर्वाने अमृताला उत्तर देत लिहिले, “काय करायचं आता, मित्रासाठी करावं लागतं. चिडेल नाहीतर”, असे मजेशीर उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

कलाकारांबरोबरच अनेक चाहत्यांनीदेखील यावर कमेंट केल्या आहेत. “क्यूट”, “दादा खूप सुंदर दिसत आहेस”, “खूप छान”, अशा अनेक कमेंट केल्याचे दिसत आहे. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे दिसत आहे.

अमृता देशमुखबाबत बोलायचे तर ती सध्या झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत काम करताना दिसत आहे. विश्वाची एक चांगली मैत्रीण म्हणून ती अनेक प्रयत्न करताना दिसते. मात्र, विश्वा तिच्याशी चांगले वागत नसल्याचे मालिकेत पाहायला मिळते.

दरम्यान, आता ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या दोन्ही मालिकांमध्ये पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.