Paaru fame Sanjana Kales dance on Baharla Ha Madhumas: पडद्यावर दिसणारे अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात.

अलीकडच्या काळात कलाकार त्यांच्या मालिका, चित्रपट किंवा वेब सीरिजमधून अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. सोशल मीडियाच्या माध्यामातूनही ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

सोशल मीडिया हे असे माध्यम झाले आहे की, त्यावर अगदी सामान्यांपासून ते विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध, नामवंत, तज्ज्ञ लोक या माध्यमाचा वापर करतात. कलाकारही अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या प्रोजेक्टबाबत, तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी शेअर करतात. अनेकदा ते विनोदी रील्स, तसेच सुंदर नृत्यदेखील सादर करतात. त्यामुळे पडद्यावर दिसणाऱ्या या कलाकारांची एक वेगळी बाजू पाहायला मिळते.

प्रियाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर सुंदर डान्स

आता पारू या मालिकेत प्रिया ही भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री संजना काळेने डान्सचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतेय की, तिने बहरला हा मधुमास या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले आहे. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिच्या डान्स स्टेप्सनी अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

जेव्हा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यावेळी त्या चित्रपटातील हे गाणे चांगलेच गाजले होते. सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातला होता. या गाण्याच्या डान्स स्टेप्स आणि श्रेया घोशालच्या आवाजातील गाण्याने अनेकांना भुरळ घातली होती अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी या गाण्यावर डान्स केला होता. आता संजनाने पुन्हा एकदा या गाण्यावर डान्स करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

संजना काळेने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. अनेकांनी ती सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. काहींनी छान डान्स केला आहे, अशा कमेंट केल्या आहेत.

पारू या मालिकेत संजनाने प्रिया ही भूमिका साकारली आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर व श्रीकांत किर्लोस्कर यांचा लहान मुलगा प्रीतम याची ती पत्नी आहे. प्रीतमला कायम पाठिंबा देणारी, घरासाठी चांगला विचार करणारी, आदित्य व पारूची चांगली मैत्रीण अशी प्रियाची भूमिका आहे.

दरम्यान, मालिकेत सतत काहीतरी नवीन घडताना दिसते, आता पारू या मालिकेत पुढे काय होणार आणि पारू व आदित्यच्या लग्नाचे सत्य अहिल्यादेवीला कधी समजणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.