हिंदी ‘बिग बॉस’च्या १४व्या पर्वामुळे एजाज खान व पवित्रा पुनिया नावारुपाला आले. एजाज-पवित्रा एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाले असल्याचं ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पाहायला मिळालं. एजाज एलिमिनेट होण्यापूर्वीच पवित्रा ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर गेली. त्यानंतर फॅमिली स्पेशल एपिसोडमध्ये ती एजाजला भेटायला आली. यावेळी दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सगळ्यांसमोर उघड झालं. आता एजाज-पवित्राने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गेल्या काही वर्षांपासून एजाज-पवित्रा एकमेकांना डेट करत आहेत. ‘बिग बॉस’पासूनच या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. आता एजाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचाही रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

एजाजने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो पवित्राला अंगठी घालताना दिसत आहे. “आपण योग्य वेळेची वाट पाहत राहिलो तर ती वेळ कधीच येणार नाही. तू माझ्याशी लग्न करशील का? तिने होकार दिला.” असं एजाजने पवित्राबरोबर फोटो शेअर करत म्हटलं आहे. दोघांचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : “त्यांचा आदर करा” वडिलांबाबत ऐकताच अभिषेक बच्चनला राग अनावर, शो सोडून निघून गेला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी पवित्राचं खासगी आयुष्य चांगलंच चर्चेत होतं. एकाच वेळी आपण दोन व्यक्तींना डेट करत असल्याचं पवित्राने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सांगितलं होतं. एजाजबरोबर पवित्राची जवळीक वाढल्यानतंर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. आता लवकरच दोघं लग्न करणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.