अभिनेत्री समृद्धी केळकर ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने साकारलेल्या ‘किर्ती’ या पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अभिनयाबरोबरच समृद्धी उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखली जाते. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

समृद्धीने काही दिवसांपूर्वीच तिच्या बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिची बहीण मानसी केळकर डिसेंबर २०२२ मध्ये अद्वैत सोमणसह विवाहबंधनात अडकली होती. यानंतर गरोदरपणात अभिनेत्रीने आपल्या बहिणीची छान काळजी घेतली. मानसीचं डोहाळजेवण देखील थाटामाटात पार पडलं होतं. समृद्धीने मानसीच्या डोहाळेजेवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’च्या फ्रेडी पाटीलचा जलवा! मराठमोळ्या उपेंद्र लिमयेंचा आंध्र प्रदेशमध्ये मोठा सन्मान; पोस्ट शेअर करत म्हणाले…

समृद्धीने नुकतीच सोशल मीडिया पोस्ट शेअर करत घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. “मी मावशी झाले…इट्स अ बॉय” अशी इन्स्टाग्राम स्टोरी अभिनेत्रीने शेअर केली आहे. सध्य कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’च्या यशानंतर सुचित्रा बांदेकर करणार नव्या मालिकेची निर्मिती! स्टार प्रवाहने शेअर केला खास प्रोमो

kelkar
समृद्धी केळकरची पोस्ट

हेही वाचा : १९ वर्षांनंतर येणार ‘नवरा माझा नवसाचा २’! चित्रपटाच्या नव्या भागात आहे दिग्गज कलाकारांची फौज, नावं आली समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, समृद्धीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेनंतर अभिनेत्रीने ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. याशिवाय समृद्धी अक्षय केळकर आणि अमृता देशमुख यांच्यासह ‘दोन कटिंग’ या सीरिजमध्ये झळकली आहे.