‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर नुकतीच लग्नबंधनात अडकली. सुरुचीने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. आता सुरुची आणि पियुषच्या लग्नानंतरच्या रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत.

सुरुची अडारकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात फोटोत सुरची आणि पियुष हे डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर सुरुची अडारकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

यावेळी सुरुचीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर पियुषने काळ्या रंगाचा फॉर्मल परिधान केले होते. त्याबरोबरच सुरुची आणि पियुषने गुलाबी रंगाचे कपडेही परिधान केले होते. यावेळी पियुषने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि सुरुचीने त्याच रंगाची साडी परिधान केली होती.

सुरुचीने या फोटोला कॅप्शन देताना “आणि आम्ही सर्व प्रेमात गुलाबी झालो”, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना तिने “६ डिसेंबर २०२३” असे लिहिले आहे.

आणखी वाचा : मराठमोळा अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर घेतल्या सप्तपदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुरुची अडारकर आणि पियुष रानडेच्या या पोस्टवर अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. सुरुची अडारकरने २००६ मध्ये सिनसृष्टीत पदार्पण केले. ‘पेहचान’ या मालिकेत ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये काम केले. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकली. सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत पाहायला मिळत आहे.