‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. शोमध्ये तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा यांनी १४ वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडली. त्यानंतर रोशन सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. शैलेश यांनी नंतर निर्माते असित मोदी यांच्यावर थकबाकी न भरल्याबद्दल दाखल केला व कोर्टाने शैलेश यांच्या बाजूनेच निकाल दिला.

या सगळ्या प्रकरणावर नुकतंच शैलेश लोढा यांनी उघडपणे भाष्य केलं. त्यांनी हा कार्यक्रम सोडण्यामागे पैसा हे कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नुकतंच शैलेश यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन या न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये शैलेश यांनी प्रथमच या विषयावर सविस्तर भाष्य केलं.

आणखी वाचा : ‘या’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने घेतलं नव्हतं मानधन; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने सांगितलं कारण

हा कार्यक्रम सोडण्यामागे स्वाभिमान ही एकमेव गोष्ट होती असं शैलेश यांनी स्पष्ट केलं. सब टीव्हीवरील ‘गुड नाइट’ इंडिया या शोमध्ये पाहुणा म्हणून शैलेश यांनी हजेरी लावली होती अन् तिथूनच या वादाला तोंड फुटलं. तिथे ते कवि शैलेश लोढा म्हणूनच गेले होते.

याबद्दल बोलताना शैलेश लोढा म्हणाले, “मी तो कार्यक्रम शूट केला, जेव्हा तो भाग टेलीकास्ट होणार होता त्याच्या आदल्या दिवशी ‘तारक मेहता का उलटा चश्मा’चे निर्माते (असित मोदी) यांनी मला फोन करून जाब विचारला की मी त्या शोमध्ये सहभाग का घेतला? मी एक कवि आहे आणि मी त्या शोमध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणूनच गेलो होतो असं त्यांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी माझ्याशी बोलताना अत्यंत असभ्य अशा भाषेचा वापर केला. मला ते अजिबात सहन नाही झालं. याआधी त्यांनी अशाच काहीशा भाषेचा वापर त्यांनी केला होता जेव्हा आमच्यात खटके उडाले होते.”

View this post on Instagram

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “त्यांनी ज्या भाषेचा वापर केला ती भाषा फारच चुकीची होती. आम्ही सगळ्यांनी मिळून एक कलाकृती निर्माण केली आहे आणि आम्ही एकसमान आहोत, त्यामुळे मला ती गोष्ट खटकली अन् १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मी मेल करून हा शो सोडत असल्याचं सांगितलं. यापुढेही त्या कार्यक्रमाची गरज म्हणून मी एप्रिल महिन्यापर्यंत शूटिंग करत होतो, पण नंतर माझे पैसे थकवल्याने मला त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी लागली. पैसा ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नव्हती, पण त्या निर्मात्यांची भाषा अन् त्यांच्याकडून मिळणारी वागणूक ही फार अपमानजनक होती.”