‘शार्क टँक’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणाऱ्या शोपैकी एक आहे. पहिल्या सीझनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर या शोचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वतः सुरू केलेल्या उद्योग किंवा व्यवसायाला भांडवल मिळवण्यासाठी व तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी अनेक नवउद्योजक या शोमध्ये आपले नशीब आजमवण्यासाठी येत असतात. प्रचंड लोकप्रिय असलेल्या या शोची भूरळ कॉँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनाही पडली आहे.

सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘शार्क टँक’ शोबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. नव्या सीझनमधील परिक्षकांचं पोस्टर सत्यजित तांबे यांनी शेअर केलं आहे. “शार्क टँक इंडिया भारताची प्रतिमा बनल्यास काहीच वावगं वाटणार नाही. या शोमुळे लाखो भारतीयांना त्यांच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा मिळत आहे. त्याचबरोबर व्यवसायातील नवीन क्षेत्रांची ओळखही या शोमधून होत आहे. ‘शार्क टँक इंडिया’चा मी चाहता आहे”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> …अन् बेस्ट फ्रेंडच्या क्रशने तेजस्विनी पंडितलाच केलं प्रपोज; अभिनेत्रीने स्वत:च सांगितला किस्सा

हेही वाचा>> “वेड लावून झालं, आता…”, मराठी दिग्दर्शकाने रितेश देशमुखच्या चित्रपटाबाबत केलेली पोस्ट चर्चेत

सत्यजीत तांबे हे स्वत: एक उद्योजक आहेत. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. राज्यातील युवा पिढीला त्यांच्या व्याख्यानांतून ते करिअर व उद्योग, व्यवसाय याबाबत मार्गदर्शन करताना दिसतात. भाषणातील अनेक व्हिडीओ क्लिप्सही ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

हेही वाचा>> सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “बाळासाहेब थोरातांना आधीच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले सत्यजीत तांबे सध्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे  चर्चेत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.