अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. आता कलाक्षेत्राबरोबरच तिने व्यावसायिक म्हणूनही काम पाहणं सुरू केलं आहे. कामाव्यतिरिक्त प्राजक्ताच्या खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच चर्चा रंगतात.

आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये…” शिव ठाकरेबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर निमृत कौरने सोडलं मौन

प्राजक्ता कोणाला डेट करत आहे का? अशाही याआधी बऱ्याच चर्चा रंगल्या. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं होतं. चार वर्षांपूर्वी मी डेटला गेली असल्याचं तिने यावेळी सांगितलं. पण खरंच प्राजक्ता सिंगल आहे का? या प्रश्नाचं उत्तर प्राजक्ताने स्वतः दिलं आहे.

व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्राजक्ताने तिचे लाल रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने म्हटलं की, “तुम्ही स्वतःचेच व्हॅलेंटाइन व्हा. हाच झोन पुढे सुरू राहील. अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य तुम्ही एकटे नाही मीही तुमच्यामध्ये सहभागी आहे.”

आणखी वाचा – “आज त्याची आई नाही याचं…” समीर चौघुले यांच्या वडिलांनी सांगितला ‘तो’ प्रसंग, अभिनेताही झाला भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे प्राजक्ता म्हणाली, “मला हे स्वातंत्र्य आवडतं. असो मित्रांनो प्रेम करा, कारण प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे.” प्राजक्ताच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी अगदी मजेशीर कमेंट केल्या आहेत. असं असेल तर मला सिंगल राहायला आवडेल, तू अजूनही सिंगल कशी, तुझं सिंगल सेनेत स्वागत, आमच्या दुःखात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद, तू आमच्यापैकीच एक आहेस अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.