कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांचे काम, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट, तर कधी त्यांनी केलेली वक्तव्ये यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत तिला तिच्या आईने का मारले होते, याची आठवण सांगितली आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेकविध विषयांवर गप्पा मारल्या आहेत. तिने कविता लिहायला कधी सुरुवात केली याविषयी बोलताना तिने म्हटले, “मी ज्या कविता प्रकाशित केल्या आहेत, त्या १२ वीपासून लिहिलेल्या कविता आहेत. मी आधी डायरी लिहायचे आणि सगळं त्यामध्ये लिहायचे. १० वर्षांनंतर वाचताना मला मजा आली पाहिजे, असं मी लिहायचे आणि आईनं ती वाचली. आईनं वाचू नये, असं मी बरंच काही काही लिहिलं होतं. हे काय लिहिलंय असं आईला वाटलं. मग मला वाटलं की, आईनं वाचलं नाही पाहिजे आणि मला काय कुलूपबंद कप्पा मिळणार नव्हता. त्यामुळे काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे म्हणून कविता लिहायला सुरुवात केली.

हेही वाचा: गर्भपात करायला भाग पाडलं, फसवणूक केली; एक्स गर्लफ्रेंडने पुरावे दिल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात आरोपपत्र दाखल

“ज्यामध्ये मी सगळं लिहिणार, माझ्या भावना मांडू शकणार, त्याची आठवणही राहणार आणि आईला कळणारसुद्धा नाही. कारण- कविता असल्यानं कल्पनासुद्धा असू शकतात. त्यामुळे कवितांकडे वळले आणि मला शेरोशायरी आवडू लागल्या. आईपासून लपवण्यासाठी मी कविता लिहायला सुरुवात केली होती. पण, पुढे लोकांनी फार मला बळ दिलं, प्रोत्साहन दिलं की, तू छाप. कारण- त्या साध्या आहेत; पण त्यातील भावना प्रबळ आहेत. खूप गहन नाही, सगळ्यांना समजायला सोपं जाईल अशा त्या कविता आहेत.”

“सगळ्यांनी अनुभवलेल्या भावना; पण वेगळ्या धाटणीनं आलेल्या आहेत. तर छाप तू, असं मला अनेकांनी सांगितलं. लोकांनी मला प्रोत्साहित केलं आणि त्यामुळे माझ्यात ते धाडस आलं. पण, कवयित्री म्हणायला मला अजूनही जड जातं. कारण- मी कवयित्री नाही. सगळेच लिहितात; मी त्या छापल्या एवढंच क्रेडिट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरांत पोहोचली. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे.