Prasad Jawade And Amruta Deshmukh : अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख मराठीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. प्रसाद ‘पारू’ मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे तर अमृता नाटक, मालिकांमध्ये काम करत असते. आता हे दोघे ‘पारू’ व ‘लक्ष्मी निवास’च्या महासंगमनिमित्त एकत्र आले होतं. अशातच या जोडीने यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा कधी एकत्र काम केलं होतं याबद्दल सांगितलं आहे.
‘झी मराठी’वरील ‘लक्ष्मी निवास’ व ‘पारू’ मालिकेच्या महासंगमनिमत्त दोन्ही मालिकांमधील कलाकार मंडळी एकत्र जमले होते. या दोन्ही मालिकेतील कलाकार यानिमित्ताने एकत्र सीन करताना पाहायला मिळाले. प्रसाद ‘पारू’ मालिकेच्या निमित्ताने तर अमृता ‘लक्ष्मी निवास’मधील तिच्या भूमिकेनिमित्त एकत्र झळकले महासंगमनिमित्त ती पुन्हा ‘लक्ष्मी निवास’मध्ये पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’नंतर या जोडीने पहिल्यांदाच या मालिकेतून एकत्र काम केलं. ‘बिग बॉस मराठी’च्या एका पर्वात हे दोघे सहभागी झाले होते. आता नुकतीच या दोघांनी एक मुलाखत दिली आहे.
प्रसाद अमृताने ‘या’ मालिकेत केलेलं पहिल्यांदा एकत्र काम
प्रसाद व अमृताने ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये प्रसादने सांगितलं की, “आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं ते ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत. २०१५ साली आम्ही या मालिकेत एकत्र काम केलं होतं.” ‘पुढचं पाऊल’ त्यावेळी ‘स्टार प्रवाह’वरची लोकप्रिय मालिका होती. अमृता पुढे म्हणाली, “तेव्हाही त्या मालिकेत हर्षदा ताई होत्या. आता पुन्हा आम्ही एकत्र काम करत आहोत. आम्ही यामध्ये एकत्र सीन करत आहोत.”
अमृताची काही दिवसांपूर्वी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एन्ट्री झाली होती. यामध्ये तिने सई ही भूमिका साकारली होती. आता पुन्हा ती या मालिकेतून झळकली. पूर्वीसुद्धा लक्ष्मी निवास व पारू मालिकेचा महासंगम विशेष भाग झाला होता; परंतु यावेळी प्रसाद व अमृता महासंगमनिमित्त एकत्र सीन करताना दिसले.
प्रसाद व अमृता आता लवकरच एकाच मालिकेतून एकत्र सीन करताना त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाले. ‘पुढचं पाऊल’ नंतर त्यांनी पहिल्यांदाच एकाच मालिकेतून एकत्र सीन केले. अमृता व प्रसाद यांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात.