scorecardresearch

Premium

“प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या करण्यापूर्वी…” तब्बल ७ वर्षांनी बॉयफ्रेंडचा खुलासा

“तिच्या मृत्यूला मीच जबाबदार असल्याचा आरोप अनेकांनी माझ्यावर केला.”

Pratyusha Banerjee
प्रत्युषा बॅनर्जी

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्व हादरले होते. याप्रकरणी तिचा प्रियकर आणि लिव्ह-इन पार्टनर राहुल राज सिंगवर गंभीर आरोप लावण्यात आले होते. पण राहुलने कायमच हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा राहुल हा एका नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने प्रत्युषाबद्दल अनेक खुलासे केले.

राहुल राज लवकरच प्रसिद्ध गायक अंकित तिवारीच्या ‘बेपरवाह २’ या म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे. नुकतंच त्याने ‘आजतक’ या वेबसाईटशी संवाद साधला. यावेळी त्याने प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणी भाष्य केले. “प्रत्युषाच्या मृत्यूनंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मी खूप त्रासलो होतो. मला अस्वस्थ वाटत होते. मला जगण्यासाठीचे काहीच उद्देश सापडत नव्हता. जेव्हा मी सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडलो तेव्हा मी काम शोधण्याचा प्रयत्न केला. पण तेही मिळाले नाही. मी खूप धडपड केली. आता कित्येक वर्षांनी माझ्या वाट्याला एक गाणे मिळाले आहे.” असे राहुलने म्हटले.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
ajit pawar and devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट 

“मला लॉकअप १ ची देखील ऑफर आली होती. पण विकास गुप्तामुळे मला तो शो करता आला नाही. त्याच्या दबावामुळे तो शो माझ्या हातून निसटला. फक्त हाच शो नाही तर त्याच्यामुळे मला अनेक शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

ज्या दिवशी प्रत्युषाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर तीन दिवस मी शुद्धीवरच नव्हतो. त्या काळात झोपेच्या गोळ्याही काम करत नव्हत्या. मला काही बोलायची, राहायची शुद्धच नव्हती. तिच्या मृत्यूला मीच जबाबदार असल्याचा आरोप अनेकांनी माझ्यावर केला. पण हे कसं होऊ शकतं? तिच्या मृत्यूच्या बरोबर आदल्या रात्री आम्ही दोघांनी पार्टी केली होती. त्यावेळी आमच्यामध्ये सर्व काही ठीक होते. त्याउलट आई-वडिलांच्या कर्जामुळे ती त्रस्त झाली होती. मी तिला नेहमी समजावून सांगायचो की आपण मिळून सर्व काही ठीक करु”, असा खुलासा राहुल राजने केला.

आणखी वाचा : “माझ्या आयुष्यातील सर्वच…” अमृता फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीची पोस्ट, Unseen फोटो केला शेअर

दरम्यान प्रत्युषा बॅनर्जीनं २०१६ साली आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्याप्रकरणी अभिनेता राहुल राज सिंह याला अटक करण्यात होती. त्यानं तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात होता. मृत्यूपूर्वी प्रत्युषा गरोदर होती. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु तिचा कथित प्रियकर राहुल राज सिंह यानं लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवलं होतं असा कयास पोलिसांकडून लावण्यात आला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pratyusha banerjee boyfriend rahul raj singh react to actress death and allegations nrp

First published on: 09-04-2023 at 19:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×