‘बिग बॉस’ फेम सेलिब्रिटी कपल, प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांना गेल्या वर्षी (२०२४) ऑक्टोबर महिन्यत कन्यारत्न प्राप्त झाले. ही आनंदाची बातमी या कपलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. जानेवारी २०२५ मध्ये या जोडप्याने त्यांच्या लेकीचे नाव जाहीर केले होते. मात्र ही पोस्ट करताना त्या दोघांनी एकमेकांच्या अकाउंटवरून वेगवेगळे फोटो पोस्ट केले होते. डिसेंबर महिन्यात (२०२४) प्रिन्सने एक पोस्ट केल्यानंतर त्या दोघांमध्ये मतभेद असल्याचे दिसले होते. यानंतर ते दोघेही एकमेकांबरोबर फोटो पोस्ट करत नव्हते. मात्र या मतभेदानंतर या जोडप्याने लोहरीनिमित्त पहिल्यांदा एकत्र फोटो पोस्ट केले आहे.

प्रिन्स आणि युविकाने त्यांच्या लाडक्या लेकीसह ‘लोहरी’ साजरी केली असून त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. युविका आणि प्रिन्स यांच्यातील वाद चर्चेत असताना या फोटोंमध्ये ते आपल्या मुलीबरोबर तिची पहिली ‘लोहरी’ एकत्र साजरी करताना दिसत आहेत. प्रिन्स आणि युविकाने आपल्या लहानग्या मुलीला पिवळ्या रंगाचा लहंगा चोली घातले होते, यामध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे. मात्र, त्यांनी या फोटोजमध्ये मुलीचा चेहरा रेड हार्ट इमोजीने झाकला आहे. युविकाने मुलीच्या डोक्यावर ओढणी ठेवली आहे, त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे.

हेही वाचा…Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर

युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांनी आपली मुलगी एकलिनबरोबर ‘लोहरी’ हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला. युविका चौधरीही या खास प्रसंगी पंजाबी लूकमध्ये दिसली. ते दोघेही आपल्या लाडक्या मुलीबरोबर खूप आनंदी दिसत होते.

या फोटोंवर प्रिन्स आणि युविकाच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. आरती सिंग, पवित्रा पुनिया यांनी या फोटोंवर शुभेच्छा दिल्या असून चाहत्यांनीही कपलला लोहरीच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा…सागर जुन्या मुक्ताला मिस करतोय का? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील रिप्लेसमेंटवर स्वरदा ठिगळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रिन्स आणि युविकामध्ये का झाले होते मतभेद?

प्रिन्स आणि युविकामध्ये मध्यंतरी वाद रंगला होता. युविकाने १ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या प्रसूतीच्या दिवशीचा व्लॉग शेअर केला होता; ज्यामध्ये तिने प्रिन्स आणि त्याच्या कुटुंबाबरोबर तिच्या प्रसूतीची तारीख ठरवली असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर प्रिन्सने आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून उत्तर दिले होते. प्रिन्स नरुलाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट करीत म्हटले होते, “काही लोक व्लॉगमध्ये खोटं बोलून स्वतःला खरं ठरवतात आणि काही लोक गप्प राहून चुकीचं सिद्ध होतात. या काळात काही लोकांना नात्यांपेक्षा व्लॉग महत्त्वाचा आहे. ही दु:खद गोष्ट आहे.”