‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. आपल्या विनोदी कौशल्याने त्याने चाहत्यांची मने जिंकलीत. पृथ्वीकचे लाखो चाहते आहेत; जे त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. पृथ्वीक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही तो सोशल मीडियावर शेअर करीत असतो.

पृथ्वीकच्या रील्सही अनेकदा चर्चेत असतात. आता त्याची एक रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. या व्हिडीओमधला पृथ्वीकचा अभिनय पाहून लोकांचे अश्रू अनावर झालेत. हा व्हिडीओ पाहून त्याच्या अभिनयाला अनेकांनी दाद दिलीय.

पृथ्वीकचा व्हायरल व्हिडीओ

पृथ्वीकने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओ सुरू होताच पृथ्वीक आरशासमोर येतो. तेव्हा तिथे असलेल्या एका बॉक्सवर त्याचं लक्ष पडतं. पृथ्वीक तो बॉक्स उघडतो. त्यात एक कानातलं असतं आणि एक कार्ड असतं ते पाहून पृथ्वीकचे डोळे पाणावतात. “जेव्हा आठवणी परत येतात”, असं पृथ्वीकने या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे.

“आईना सच ही तो बोलता है।” अशी कॅप्शन पृथ्वीकने या व्हिडीओला दिली आहे. पृथ्वीकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अभिनेत्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “भावाचं ब्रेकअप झालं आहे, असंच वाटतंय.” तर दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “कोणत्या दु:खात आहेस तू”

एक जण कमेंट करीत म्हणाला, “रडवणार आहेस एक दिवस.” तर, अनेकांनी त्याच्या एक्सप्रेशन्सला दाद दिलीय. लापता लेडीज या चित्रपटातील ‘ओ सजनी रे’ हे प्रसिद्ध गाणं पृथ्वीकनं या व्हिडीओला जोडलं आहे.

हेही वाचा… लग्नाच्या तीन वर्षानंतर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री जाणार सासरी; गुड न्यूज देत म्हणाली, “मी खूप…”

पृथ्वीकनं हा व्हिडीओ काल शेअर केला असून, या व्हिडीओला ८५ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर, आठ हजारांपेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला आल्या आहेत.

हेही वाचा… “मी श्रीमंत बनू शकत नाही”, मनोज बाजपेयींचं वक्तव्य चर्चेत, अंबानींचा उल्लेख करत म्हणाले…

दरम्यान, पृथ्वीकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटानंतर पृथ्वीक आता दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. ‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती असून, त्यामध्ये बरेच मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यामध्ये पृथ्वीक प्रतापसह अभिनेत्री सायली संजीव, सुहास शिरसाट या कलाकारांचाही समावेश आहे.