scorecardresearch

Premium

“त्यांनी मला त्यासाठीच बोलवलं होतं…” राज ठाकरे-शिव ठाकरेच्या भेटीत नेमकं काय घडलं? शिवने दिले सविस्तर उत्तर

या भेटीमागचे कारण काय, यावेळी नेमकी कशाबद्दल चर्चा झाली, याबद्दल शिव ठाकरेने सविस्तर भाष्य केले.

shiv thakare raj thackeray
शिव ठाकरे राज ठाकरे

बिग बॉस १६ वे पर्व संपल्यापासून मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा चांगलाच चर्चेत आहे. शिव ठाकरे हा बिग बॉसचा विजेता ठरला नसला तरी त्याने सर्व प्रेक्षकांची मनं मात्र जिंकून घेतली. शिव ठाकरेने नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण काय, यावेळी नेमकी कशाबद्दल चर्चा झाली, याबद्दल शिव ठाकरेने सविस्तर भाष्य केले.

शिव ठाकरे हा शनिवारी २५ फेब्रुवारी राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचला. यावेळी त्याने राज ठाकरेंची आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर शिव ठाकरेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिव ठाकरेने या भेटीबद्दलची सविस्तर माहिती दिली.
आणखी वाचा : “वीणा जगताप हा विषय संपलाय” शिव ठाकरेची आई स्पष्ट शब्दात म्हणाली “तिने लग्नाचा…”

Fali Nariman
फली नरीमन ‘हिंदू-धर्माधारित राज्या’बद्दल काय म्हणाले होते?
strengthening of weak democracy
दुबळ्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी..
Mallikarjun Kharge
राज्यसभेतील मोदींच्या भाषणावर मल्लिकार्जुन खरगेंचं चोख प्रत्युत्तर; सांगितला NDA चा फुल फॉर्म!
Krishna Janmabhoomi Case
Krishna Janmabhoomi : औरंगजेबानेच तोडलं होतं मथुरेतील केशवदेव मंदिर, कृष्ण जन्मभूमीप्रकरणी ASI चा मोठा खुलासा

“राज ठाकरेंनी मला अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मराठी माणूस पुढे पाऊल टाकतो तेव्हा राज ठाकरे कायमच शाबासकी देतात आणि त्याची त्यावेळी खरंच खूप गरज असते. राज ठाकरेंनी मला त्यासाठीच बोलवलं होतं. यावेळी तिथे राज ठाकरेंच्या पत्नी, उर्वशी ठाकरे उपस्थित होत्या. त्या आमच्या बिग बॉसच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. राज ठाकरे हे मराठी मुलं किंवा मुली पुढे जात असतील तर नेहमीच त्यांना शाबासकी देत असतात आणि यापूर्वीही त्यांनी दिली आहे.”

“मला मराठीतील अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडून खूप ऑफर आल्या आहेत. मला मराठी आणि हिंदी दोन्हीत काम करायचं आहे. मात्र सध्या मी ‘खतरों के खिलाडी’ साठी तीन महिन्यांसाठी बाहेर जातो आहे, त्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे. मला सर्वकाही करायचे आहे. मी नेमकं काय काय करु असा प्रश्न मला पडलाय. ज्या गोष्टींची मी वाट पाहिली ते आता होत आहे. एका मराठी चित्रपटाचे शूटिंगही १० दिवसात सुरु होणार आहे. पण मी मराठीमध्ये प्राधान्याने काम करेन”, असे शिव ठाकरेने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “आम्हाला एकमेकांचं तोंड…” शिव ठाकरेने सांगितलं वीणा जगतापशी ब्रेकअप करण्यामागचं खरं कारण

दरम्यान यावेळी शिव ठाकरेला राज ठाकरे, मनसे आणि निवडणूक याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्याची त्याने फार सविस्तरपणे उत्तर दिली. बिग बॉस १६ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोट होते. या पाच जणांमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी, ३१ लाख आणि गाडी देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray called me to congratulate said shiv thakare after meet at shivtirth nrp

First published on: 26-02-2023 at 10:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×