सध्या अनेक मराठी कलाकार मंडळी स्वतःचा व्यवसाय सुरू करताना दिसत आहेत. नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’मधील अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वतःचं नवं हॉटेल सुरू केलं. याआधी याच कार्यक्रमातील एका कलाकाराने पत्नीसह व्यवसाय सुरू केला होता. त्याची दखल आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली असून या कलाकाराचं कौतुक केलं आहे.

‘चला हवा येऊ द्या’मधील हा कलाकार म्हणजे लोकप्रिय संगीत संयोजक व संगीतकार तुषार देवल. तुषारने पत्नी स्वातीसह व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी खाद्यसंस्कृती जोपासण्याकरिता बोरिवली पूर्व येथे भव्य मिसळ महोत्सव सुरू आहे. याच मिसळ महोत्सवात तुषार व स्वातीने ‘देवल मिसळ’ स्टॉल लावला आहे. याच स्टॉलला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. हा प्रसंग तुषारने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 Grand Finale: करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातील गाण्यांवर ऐश्वर्या-नील, इशा-समर्थचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ आला समोर

तुषारने राज ठाकरेंबरोबरचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “पहिल्यांदाच राज साहेबांना एवढ्या जवळून बघितलं… त्यांना आमच्या मिसळी विषयी सांगितलं आणि त्यांनी खांद्यावर हात ठेऊन शुभेच्छा दिल्या…बस्स…अजून काय पाहिजे…एवढ्या गर्दीत २ शब्द ऐकून घेतल्याबद्दल राज साहेबांचे मनापासून धन्यवाद.”

View this post on Instagram

A post shared by Tushar Deval (@tushardeval)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तुषार व स्वातीच्या या नव्या व्यवसायाला कलाकार मंडळींसह त्यांचे चाहते शुभेच्छा देत आहेत. यापूर्वी दोघांची निर्मिती असलेलं ‘गौराई आलिया माहेरा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात स्वातीबरोबर अभिनेत्री स्वाती पानसरे आणि गायिका सायली कांबळे झळकली होती.